Join us
Daily Top 2Weekly Top 5

खेळ मातीतला : लाकडी मल्लखांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 04:16 IST

भारतात अनेक विविध खेळ खेळले जातात. यापैकी काही बैठे, मैदानी, सभागृहातील, पायावरील इ. खेळ आहेत.या सदरात आपण मल्लखांब या अस्सल मराठमोळ्या खेळाच्या प्रकरांविषयी जाणून घेणार आहोत.

- श्रीनिवास हवालदारलाकडी (पुरलेला) मल्लखांब  हा जमिनीवर उभा या प्रकारात मोडतो. हा मल्लखांब सागवान (ळीं‘ हङ्मङ्म)ि किंवा शिसम या लाकडापासून बनवितात. हल्ली शक्यतो सागवानपासूनच याची निर्मिती होते. या मल्लखांबाला एरंडेल तेल लावल्याने घर्षण (ऋ१्रू३्रङ्मल्ल) कमी होते. सध्या हा मल्लखांब स्पर्धात्मकदृष्ट्याही उपयोगात आणला जातो. हा मल्लखांब शरीराचा वरील भाग (बोंड), मान व मल्लखांबाचे शरीर अशा तीन भागांत सरळसोटपणे असतो. बोंड हे गोलाकार असते त्याखालोखाल मल्लखांबाची मान व नंतर शरीर असे असते. या मल्लखांबाची उंची १० फूट म्हणजे जमिनीवरील ८ फूट व जमिनीखाली २ फूट असते. किंवा १२ फूट म्हणजेच जमिनीवर १० फूट व जमिनीखाली २ फूट अशीही असते. हा मल्लखांब जमिनीशी ९० अंश (काटकोनात) असतो.मल्लखांबातील या प्रकारात विविध आढ्या, उड्या, तेढ्या, वेल, कसरतीचे व ताकदीचे व्यायामप्रकार, आसन, बोंडावरील व्यायाम प्रकार, मानेतील व्यायामप्रकार, शिडी, दसरंग, उतरत्या, फरारे इ. विविध व्यायाम प्रकार मल्लखांबपटू करतात.मल्लखांबाच्या या व्यायाम प्रकारांचा स्पर्धात्मकदृष्ट्या आंतरशालेय स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय तसेच आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठीय स्तरावर समावेश आहे. मुलांसाठी (पुरलेला) लाकडी मल्लखांब हा १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील गटांत खेळला जातो. हा मल्लखांब प्रकार मैदानात, पटांगणात असतो.(लेखक राष्ट्रीय मल्लखांबपटूव प्रशिक्षक आहेत.)shrinivas.havaldar@yahoo.co.in

टॅग्स :मुंबई