वंडर पार्कमधील राइड सुरू होणार

By Admin | Updated: October 31, 2014 00:30 IST2014-10-31T00:30:18+5:302014-10-31T00:30:18+5:30

पालिकेच्या वंडर पार्कमधील गैरसोयींविरोधात लोकमतने आवाज उठविताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पार्कमधील कचरा काढण्यात आला आहे.

Wonder park ride will start | वंडर पार्कमधील राइड सुरू होणार

वंडर पार्कमधील राइड सुरू होणार

नवी मुंबई : पालिकेच्या वंडर पार्कमधील गैरसोयींविरोधात लोकमतने आवाज उठविताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पार्कमधील कचरा काढण्यात आला आहे. कोरडे तलाव पाण्याने काठोकाठ भरण्यात आले असून टॉय ट्रेन व राइडही शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. 
नवी मुंबई महानगरपालिकेने जवळपास 38 कोटी रुपये खर्च करून नेरूळमध्ये वंडर पार्क उभारले आहे. शहरातील सर्वात चांगले उद्यान म्हणून याची ओळख होती. परंतु सद्यस्थितीमध्ये उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली होती. येथील चारही राइड व टॉय ट्रेन बंद झाली होती. तलाव कोरडे पडले होते. ट्रॅफिक गार्डनचा उपयोग केला जात नव्हता. सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. प्रसाधनगृहांची साफसफाई केली जात नव्हती. सुविधा काहीच नसताना नागरिकांकडून प्रौढांसाठी 35 रुपये व लहान मुलांसाठी 25 रुपये शुल्क घेतले जात होते. याविषयी लोकमतने आवाज उठविताच महापालिका प्रशासनाने तत्काळ उद्यानाची डागडुजी सुरू केली आहे. 
पालिका आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी उद्यान पूर्ववत करण्याच्या सूचना अधिका:यांना दिल्या आहेत. दोन दिवसांमध्ये येथून जवळपास चार डंपर कचरा काढण्यात आला आहे. किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. तलावांमध्ये पाणी सोडून कारंजे पूर्ववत करण्यात आले आहेत. प्रसाधनगृहांची स्वच्छता केली आहे. गुरुवारी राइड व टॉयट्रेनची सव्र्हिसिंग सुरू केली असून शुक्रवारी राइड सुरू केल्या जाणार आहेत. देखभालीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी वर्तमानपत्रमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
 
वंडर पार्कमधील आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. राइड व टॉयट्रेनची सव्र्हिसिंग करून घेतली असून लवकरच ही सुविधा पूर्ववत सुरू केली जाणार आहे.
- संजय देसाई, कार्यकारी अभियंता

 

Web Title: Wonder park ride will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.