महिलांची पाण्यासाठी वणवण
By Admin | Updated: February 13, 2015 22:28 IST2015-02-13T22:28:59+5:302015-02-13T22:28:59+5:30
खालापूर तालुक्यातील माजगाव वाडीतील ग्रामस्थांना पाणीप्रश्नाची समस्या अनेक वर्षे भेडसावत आहे. या वाडीतील महिला डोक्यावर पाण्याने भरलेले

महिलांची पाण्यासाठी वणवण
राकेश खराडे, मोहोपाडा
खालापूर तालुक्यातील माजगाव वाडीतील ग्रामस्थांना पाणीप्रश्नाची समस्या अनेक वर्षे भेडसावत आहे. या वाडीतील महिला डोक्यावर पाण्याने भरलेले तीन हंडे घेऊन दीड किमी प्रवास एका फेरीत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये सरपंच असलेल्या महिलेचाही समावेश आहे.
पावसाळा संपताच वाडीत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी वाडीतील महिलांना दररोज डोक्यावर तीन हंडे घेऊन डोंगरातील कच्च्या वाटेने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पांैध गावातील विहिरीवर जावे लागते. माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या मथुरा मधुकर वाघे याही माजगाव आदिवासीवाडीत राहत असून घरात नऊ माणसांचे कुटुंब असल्यामुळे पिण्याचे पाणी आणण्यासाठी दोनवेळा डोंगर चढ-उतार करावा लागत असल्याचे सांगितले. पूर्वी विहिरीला बारमाही पाणी असे, परंतु मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग बांधण्यावेळी बोगद्याचे काम केल्यामुळे नैसर्गिक झऱ्याचा मार्गच बदलला, त्यामुळे विहीर कोरडी पडली आहे.