महिलांंच्या शौचालयात आंघोळ करणाऱ्यास चोप

By Admin | Updated: December 28, 2014 00:47 IST2014-12-28T00:47:54+5:302014-12-28T00:47:54+5:30

मुलुंड रेल्वे स्थानकातील महिला शौचालयात आंघोळ करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला शनिवारी बेदम मार पडला़

In the women's toilet, chop the bath | महिलांंच्या शौचालयात आंघोळ करणाऱ्यास चोप

महिलांंच्या शौचालयात आंघोळ करणाऱ्यास चोप

मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकातील महिला शौचालयात आंघोळ करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला शनिवारी बेदम मार पडला़
महत्त्वाचे म्हणजे भाजपा महिला कार्यकर्त्या येथे स्वच्छता मोहिमेसाठी आल्या होत्या़ त्यावेळी महिला शौचालयात हा तरुण आंघोळ करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांना आढळले़ याने राग अनावर झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी तत्काळ त्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या व त्याला चोप देण्यास सुरुवात केली़ त्या तरुणाने महिलांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत तेथून पळ काढला़ त्यानंतर शौचालयाची देखरेख करणाऱ्या महिलेला भाजपा कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले़ तेव्हा त्या तरुणाला याच महिलेने पैसे घेऊन तेथे आंघोळ करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले़ महत्त्वाचे म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून शौचालयाची देखरेख करण्यासाठी ठेकेदार नाही.
प्रबंधकांचे चौकशीचे आश्वासन
या प्रकारानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक प्रबंधक एम़ डॅनियल यांच्याकडे मोर्चा वळवला़ डॅनियल यांनी याची चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन मुलुंड भाजपा महिला मोर्चाच्या
अध्यक्षा बिंदिया सोनावणे यांना
दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: In the women's toilet, chop the bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.