मुंबई - मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी मंगळवारी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले. यात महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्या तरी परळ, सायन, धारावी, माटुंगा व अंधेरी पश्चिम परिसरातील बहुतांश प्रभागांमध्ये महिलांचाच दबदबा असणार आहे. दरम्यान, आरक्षण सोडतीमुळे पक्षांचे समीकरण बदलणार असून, महिला उमेदवार मिळवण्यासाठी सर्व पक्षांना धावपळ करावी लागणार आहे.
महापालिकेच्या १७२ ते १८१ या १० वॉर्डांपैकी आठ वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. यातील १७६ वॉर्ड ओबीसी महिला, तर उर्वरित सात सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे सायनमध्ये महिलांचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या राजश्री शिरवाडकर, नेहल शाह, कृष्णवेणी रेड्डी यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव, तर काँग्रेसमधून शिंदेसेनेत आलेल्या पुष्पा कोळी यांचा वॉर्ड सर्वसाधारण झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा प्रभाग ओबीसी महिला व शिंदेसेनेचे मंगेश सातमकर यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला आहे.
अंधेरी पूर्व विभागातील ७२ ते ८६ या १५ वॉर्डांपैकी ११ वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. यात तीन वॉर्ड ओबीसी (महिला) तर उर्वरित आठ प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक व विधानसभेतील शिंदेसेनेचे आमदार मुरजी पटेल, उद्धवसेनेचे माजी नगरसेवक व विद्यमान आमदार अनंत (बाळा) नर यांचे वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
सलग २ ते ३ वॉर्ड आरक्षितलोकसंख्या व टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने प्रथम अनुसूचित जाती, जमाती त्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग महिला प्रवर्ग, सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले.सलग दोन ते तीन वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, यासाठी आरक्षित झाल्याने पुरुषांना त्या विधानसभा क्षेत्रात जास्त संधी मिळालेली नाही.मुंबईतील एकूण ३६ विधानसभा क्षेत्रांपैकी नऊ विधानसभेत नगरसेविकांची संख्या आरक्षणामुळे अधिक वाढणार आहे.
आमदार पत्नीचा वॉर्ड मागास प्रवर्गासाठी आरक्षित भाजप आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती यांचा वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका उज्ज्वला मोडक, उद्धवसेनेच्या प्रियांका सावंत, शिंदेसेनेच्या सोफी नाजिया, काँग्रेसच्या सुषमा राय यांचे वॉर्ड तसेच राहिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
Web Summary : Mumbai's ward reservations favor women, especially in Matunga, Andheri. Political parties are now rushing to find suitable female candidates due to changed ward dynamics. Some sitting corporators' wards are reserved for women, while others get a reprieve. Overall, women's representation in Mumbai's municipal elections is set to increase.
Web Summary : मुंबई के वार्ड आरक्षण महिलाओं के पक्ष में हैं, विशेष रूप से माटुंगा, अंधेरी में। बदले हुए वार्ड समीकरणों के कारण राजनीतिक दल अब उपयुक्त महिला उम्मीदवारों को खोजने के लिए दौड़ रहे हैं। कुछ मौजूदा पार्षदों के वार्ड महिलाओं के लिए आरक्षित हैं, जबकि अन्य को राहत मिली है। कुल मिलाकर, मुंबई के नगर निगम चुनावों में महिलाओं का प्रतिनिधित्व बढ़ने वाला है।