Join us

Women;s Day Special: ... हिनेच घडविले थोर शिवराय, संभाजी अन् शूरवीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 16:19 IST

सासर आणि माहेरची नाती जपण्या अविरत धडपडशी

जागतिक महिला दिन

दया, क्षमा, सेवा, सहनशीलता आणि कर्तव्यदक्षता असे स्त्रीची महतीविविध गुणांची खाण असे ही स्त्री धर्माची ख्याती

कन्या होऊनी माता-पित्याची होई, वृद्धत्वाची काठीसहचारिणी म्हणुनी पतीदेवाच्या राही सदैव पाठी

भगिनी म्हणुनी भावंडांना समाजावून देई धीरहिनेच घडविले थोर शिवराय, संभाजी आणि शूरवीर

गृहिनी म्हणुनी कुटुंबाचा वाहशी तू भारमाता होवुनी आपल्या बाळा घडविशी संस्कार

सासर आणि माहेरची नाती जपण्या अविरत धडपडशीआपले आरोग्य जपण्या मात्र केंव्हातरी विसरशी

निर्भय हो, सावध हो, नको बाळगु कशाची भीतीअत्याचाराचा बिमोड करण्या, हवी समाज जागृती

तुम्हा भगिनींना एकच सल्ला, आधी जपा आपले आरोग्यमग, संसार आणि कामाचे वेळापत्रक होईल सुयोग्य

सेवानिवृत्त परिसेविकाकल्पना रविंद्र बोरकरसरकारी रुग्णालय, मुंबई 

टॅग्स :महिलामुंबई