Join us  

'महिला आयोग आपल्या दारी’, महिलांच्या तक्रारींचे करणार निवारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 5:45 PM

 महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईतील महिलांच्या तक्रारींचे निवारण करणार आहे.

मुंबई :  महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईतील महिलांच्या तक्रारींचे निवारण करणार आहे. यावेळी अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात अस आवाहन या उपक्रमाच्या निमित्ताने केल आहे.  

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न  करत आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करण, सुनावणीसाठी उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसंच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारी दाखल करून त्याच ठिकाणी त्यावर कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोग याद्वारे करत आहे. 

दिनांक १२ रोजी या संकल्पनेअंतर्गत आयोग ठाणे, रायगड, पालघर तसेच नवी मुंबईतील नव्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार नगर, हिरानंदानी मेडॉस, पोखरण रोड क्र – २, ठाणे (प) येथे दुपारी 1 वाजता नव्या तक्रारी वर कार्यवाही होणार आहे.

टॅग्स :विजया रहाटकर