मुंबई: महापौर, विरोधी पक्षनेत्या तसेच विविध समित्यांचे अध्यक्षपदही मुंबई महापालिकेत महिला भूषवत असताना आता प्रशासनाच्या सर्वोच्च पदीही अश्विनी भिडे विराजमान झाल्या आहेत. यामुळे महापालिकेत खऱ्या अर्थाने महिलाराज' अवतरले असल्याचे दिसून येत आहे.
अनेक वर्षांनी मुंबई महापालिकेत खऱ्या अर्थाने महिलांचा दबदबा निर्माण झाला आहे. महिला आरक्षणानुसार महिला नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून तर आल्या आहेतच; शिवाय महत्त्वाच्या समित्यांचे आणि प्रभाग समित्यांचे अध्यक्षपदही त्या भूषवत आहेत. प्रशासन प्रमुख म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. भिडे याही आधी पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. सध्या पालिका प्रशासनात डॉ. अश्विनी जोशी या अतिरिक्त आयुक्त आहेत.
प्रशासनाव्यतिरिक्त लोकप्रतिनिधींमध्ये रितू तावडे या महापौर आहेत. तर, विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी किशोरी पेडणेकर सांभाळत आहेत. काही वैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपदही महिलांकडे आहे. यात संध्या दोशी (सुधार समिती), तृष्णा विश्वासराव (बेस्ट समिती), राजश्री शिरवाडकर (शिक्षण समिती), दीक्षा कारकर (विधी समिती), हेतल गाला (बाजार व उद्यान समिती), यामिनी जाधव (स्थापत्य समिती: शहर), संगीता शर्मा (स्थापत्य समिती: उपनगरे) आणि मीनल तुर्डे (महिला व बालकल्याण समिती) या विविध समित्यांचे अध्यक्षपद भूषवत आहेत.
प्रभाग समित्यांवरही वर्चस्व
१९ प्रभाग समित्यांपैकी नऊ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद महिलांकडे आहे. मानसी सातमकर (एफ दक्षिण-उत्तर), पद्मजा चेंबूरकर (जी-दक्षिण), रोहिणी कांबळे (एच पूर्व-पश्चिम), श्रीकला पिल्ले (पी- दक्षिण), लीना देहेरकर (आर-दक्षिण), खैरनुसा अकबर हुसेन (एम- पूर्व), आशा मराठे (एम-पश्चिम), साक्षी दळवी (एस आणि टी) आणि अश्विनी मते या एन वॉर्ड प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषवत आहेत.
Web Summary : Mumbai municipality witnesses true 'women's rule' with women leading key positions. From Mayor to committee heads and now top administrator, Ashwini Bhide, women dominate, marking a significant shift in governance and representation.
Web Summary : मुंबई नगर निगम में महिला शक्ति का उदय हुआ है, जहाँ महिलाएँ प्रमुख पदों पर आसीन हैं। महापौर से लेकर समिति प्रमुखों और अब शीर्ष प्रशासक अश्विनी भिडे तक, महिलाओं का दबदबा है, जो शासन और प्रतिनिधित्व में एक महत्वपूर्ण बदलाव का प्रतीक है।