मुंबई शहरात महिला सुरक्षितच
By Admin | Updated: November 27, 2014 01:21 IST2014-11-27T01:21:16+5:302014-11-27T01:21:16+5:30
गेल्या काही वर्षामध्ये शहरात महिलांच्या बाबतीत घडणा:या गुन्ह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती.

मुंबई शहरात महिला सुरक्षितच
मुंबई : गेल्या काही वर्षामध्ये शहरात महिलांच्या बाबतीत घडणा:या गुन्ह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी छोटय़ातला छोटा गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी या गुन्ह्यांमध्ये 21 टक्यांनी घट झाली आहे. त्यामुळे मुंबई शहर हे महिलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केला आहे.
मंगळवारी मराठी पत्रकार संघामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये प्रजा फाउंडेशनने मुंबई शहरात महिला सुरक्षित माहिती समोर आणली. गेल्या काही महिन्यांमध्ये बलात्कार, विनयभंग आणि महिलांवरील होणारे अत्याचार हे वाढल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना छोटय़ातला छोटा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांच्या सांख्यिकी आकडेवारीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने शहरात गुन्हे वाढल्याचे दिसून येत असल्याचे मारिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
जानेवारी 2क्14 ते ऑक्टोबर 2क्14 या 1क् महिन्यांमध्ये मुंबईत 511 इतके बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 71.9 टक्के बलात्कार हे लग्नाचे आमिष दाखवून झाले आहेत. तर 12.37 टक्के बलात्कार हे शेजा:यांकडून, 6.7 टक्के बलात्कार वडील किंवा पालकांकडून, 4.97 टक्के नातेवाइकांकडून आणि 6 टक्के बलात्कार हे अनोळखी व्यक्तींकडून केले गेले आहेत. मात्र महिलांवरील होणारे हल्ले, यामध्ये महिलांचा हुंडय़ासाठी छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणो या गुन्ह्यांमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 21ने घट झाली
आहे. (प्रतिनिधी)
च्महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रंमध्ये प्रसिद्ध होत असतात. महिला, मुली सुरक्षितपणो प्रवास करू शकत नाहीत. हे मुंबईतील चित्र बदलणो गरजेचे आहे. यासाठीच 19 महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेतील 35क् विद्याथ्र्यानी आणि अक्षर स्वयंसेवी संस्थेने सार्वजनिक वाहतूक महिला, मुलींसाठी सुरक्षित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
च्गुरुवारपासून ही मोहीम शहरामध्ये सुरू होणार असून पुढचे 16 दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात सकाळी 1क्.3क् वाजता जीपीओ येथून होणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी महिला, मुली प्रवाशांना सुरक्षित प्रवास करू द्या याविषयी जनजागृती करणार आहेत.
जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा
अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेले आरोपी हे ठोस पुरावे नसल्याने जामिनावर मुक्त होतात. या आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक साहाय्यक पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार या वर्षात भादंवि कलमानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाल्याचे प्रमाण 38 टक्के झाले आहे. शिवाय सर्व गुन्ह्यांमधील हेच प्रमाण 49 टक्के झाले आहे.