Join us  

देशभरातील महिला राजकारणी ‘सोशल’ अत्याचाराच्या बळी; अमनिस्टी इंटरनॅशनल इंडियाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 4:28 AM

जागतिक पातळीवर समाज माध्यमांमध्ये लिंगभेदविषयक हिंसेत वाढ

- स्नेहा मोरेमुंबई : गेल्या काही वर्षांत व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचे माध्यम सशक्त मानले जाते. मात्र याच सोशल मीडियाच्या टिष्ट्वटर साइटवर २०१९ सालामध्ये देशभरातील ९५ महिला नेत्या अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. भारताविषयी पहिल्यांदाच अमनिस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात सोशल मीडियावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार, जागतिक पातळीवर समाज माध्यमांमध्ये लिंगभेदविषयक हिंसा वाढत असल्याची चिंताजनक बाब मांडली आहे.

२०१९मध्ये निवडणुकांच्या काळात महिला राजकारणी सोशल मीडियावर अत्याचाराला बळी जाण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. देशभरातील ९५ महिला राजकारणी वर्षभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विटरवर जवळपास दहा लाख वाईट, घृणास्पद शेरेबाजीला बळी पडल्या आहेत. मार्च ते मे २०१९ या कालावधीत पाचपैकी एका महिला राजकारण्याविषयी तिरस्कार आणि लिंगभेदावरून टिप्पणी करण्यात आली आहे. देशभरात एकूण ७२४ महिला उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात होत्या.खच्चीकरण करण्याचा प्रयत्नलोकसभा निवडणुकांच्या काळात महिला राजकारण्यांविषयी १ लाख १४ हजार ७१६ नकारात्मक ट्विट्स करण्यात आले आहेत. याखेरीज, मुस्लीम धर्मीय असणा-या महिला राजकारण्यांवर धर्माविषयी ९४.१ टक्के ‘सोशल अत्याचार’ करण्यात आला. तर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गीय जातीतील महिला राजकारण्यांना त्यांच्या जातीविषयी ५९ टक्के टिप्पणी करण्यात आली. अमनिस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी याविषयी सांगितले की, महिलांना राजकारणासारख्या क्षेत्रात येण्यापासून खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने हे प्रकार घडत आहेत.अहवालातील प्रमुख निरीक्षणे15.3 % हिंदी भाषेतील ट्विट्सचा समावेश ट्विट्स14.1 % इंग्रजी, तर 5 % मराठी ट्विट्स

तिरस्कारात्मक 4.1 % तर, धार्मिक 94.1 % ट्विट्सशारीरिक टिप्पणी 28.7 % तर, जातीभेदावरून 37.1 % ट्विट्स

टॅग्स :सोशल मीडिया