Join us  

घरखरेदीसाठी महिला कॉन्स्टेबलचा छळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:25 AM

गावी घर आणि जमिनीच्या खरेदीसाठी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा छळ करणाºया राजेश गोस्वामी या पतीविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : गावी घर आणि जमिनीच्या खरेदीसाठी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा छळ करणाºया राजेश गोस्वामी या पतीविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.मूळ राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात नोकरीला असलेल्या राजेशचा ठाण्यातील या महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत १० महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. नोकरीनिमित्ताने तो राजस्थानमध्येच वास्तव्याला आहे. केवळ अधूनमधूनच त्याचे ठाण्यात येणे होते. मात्र, इकडे आल्यानंतर तो पत्नीवर नेहमीच संशय घेत होता. त्यातूनच गावी घर आणि जमीनखरेदीसाठी कर्ज घेण्यास सांगून तो तिच्याकडे त्यासाठी पगाराची मागणी करीत होता. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन हीन दर्जाचे मेसेज तिला पाठवत होता. शिवाय, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून जिवाचे बरेवाईट करण्याची धमकीही दिल्याचे तिने ठाणेनगर पोलीस ठाण्यात १६ आॅक्टोबर रोजी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.चौकशी सुरूघर आणि जमीन खरेदीसाठी छळ करण्यात येत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. परंतु, आतापर्यंत या प्रकरणी चौकशी सुरू असल्यामुळे पती राजेशला अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी श्रद्धा वायदंडे या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :गुन्हापोलिस