मुलांसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:52 IST2017-07-28T01:52:38+5:302017-07-28T01:52:38+5:30

दारू पिऊन मारहाण करणाºया नवºयाच्या जाचाला कंटाळून एका महिलेने दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावरील रेल्वे पोलिसाने सतर्कता दाखवित तिघांना वाचविले. हा प्रकार कांदिवली रेल्वे स्थानकात घडला.

woman's suicide attempt with children | मुलांसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलांसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : दारू पिऊन मारहाण करणाºया नवºयाच्या जाचाला कंटाळून एका महिलेने दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावरील रेल्वे पोलिसाने सतर्कता दाखवित तिघांना वाचविले. हा प्रकार कांदिवली रेल्वे स्थानकात घडला.
बुधवारी सकाळी ११च्या सुमारास ३० वर्षांची एक महिला दोन लहान मुलांसोबत कांदिवली रेल्वे स्थानकात आली. तेथे एक लोकल आल्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन लोकलसमोर उडी मारायचा प्रयत्न केला. मात्र स्थानकावर बंदोबस्ताला असलेल्या कॉन्स्टेबल सुरवाड यांचे त्याकडे लक्ष गेले. त्यांनी क्षणात तिच्या दिशेने धाव घेत तिला मागे खेचले. ‘मला सोडा, मला मरायचं आहे,’ असे म्हणत तिने सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरवाडे यांनी अन्य महिला प्रवाशांच्या मदतीने तिला पोलीस चौकीत नेले. तिची चौकशी केली असता तिने मालाडच्या कुरार येथे राहण्यास असून, पतीच्या दारूच्या व्यसनास आणि दररोजच्या मारहाणीला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याला समज देत त्यांना घरी पाठविले.

Web Title: woman's suicide attempt with children