पाण्यासाठी महिलांची वणवण
By Admin | Updated: November 3, 2014 23:08 IST2014-11-03T23:08:15+5:302014-11-03T23:08:15+5:30
खालापूर तालुक्यातील आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाघ्रतवाडी धनगर समाजातील महिलांची उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी वणवण लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचे दुर्लक्ष

पाण्यासाठी महिलांची वणवण
वावोशी : खालापूर तालुक्यातील आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाघ्रतवाडी धनगर समाजातील महिलांची उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी वणवण लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचे दुर्लक्ष
खंडाळा घाटातील एका टोकाला असलेल्या गारमाळ गावाला लागून असलेल्या वाघ्रनवाडी धनगरवाडीत पावसाळा संपून महिला उलटत नाही तोच येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामस्थांच्या सोयीसाठी याठिकाणी एका खाजगी कंपनीकडून गावात पाणी आणण्यात आले असले तरी ते पाणी ग्रामस्थांसाठी नसून कंपनी उभारत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या कामासाठी आहे. या कामासाठी लोणावळा नगरपालिकेकडून पाणी आणले आहे. मात्र या धनगरवाडीला पाणी देण्यास नकार दिला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावासाठी मिळणारे पाणी धनदांडग्यांसाठी मात्र धनगर समाजाच्या महिला कित्येक मैलावरती पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना प्रशासन व राजकीय पुढारी बघ्याची भूमिका घेत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.