हाजी अली येथे कारवाई टाळण्यासाठी महिलेचा ड्रामा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:20+5:302020-12-04T04:18:20+5:30
पोलिसांचाच व्हिडीओ व्हायरल करत केले आरोप हाजी अली येथे कारवाई टाळण्यासाठी महिलेचा ड्रामा... पोलिसांचाच व्हिडीओ व्हायरल करत केले आरोप ...

हाजी अली येथे कारवाई टाळण्यासाठी महिलेचा ड्रामा...
पोलिसांचाच व्हिडीओ व्हायरल करत केले आरोप
हाजी अली येथे कारवाई टाळण्यासाठी महिलेचा ड्रामा...
पोलिसांचाच व्हिडीओ व्हायरल करत केले आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विनाहेल्मेट हटकल्याच्या रागात पोलिसांवरच खोटा आरोप करत त्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, हाजी अली दर्गा येथील किनाऱ्यालगत असलेली गर्दी हटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आपल्यावर कारवाई करू नये म्हणून महिलेने पोलीस दारू पिऊन कारवाई करत असल्याचे दाखवत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच दरम्यान वाहन मागे जाताच त्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. गुरुवारी या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली होती.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजी अली दर्गा येथे येणाऱ्या भाविकांसाठी वेळ ठरविण्यात आलेली आहे. मात्र तरीही मध्यरात्री उशिरापर्यंत येथील किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच दरम्यान बुधवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांची नजर गर्दीवर गेली. त्यांनी येथील नागरिकांना घरी जाण्याच्या सूचना केल्या. याच दरम्यान अय्याज आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांपैकी एकाने त्यांच्या वाहनासह दोघांचे फोटो घेतले. अशात आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी या महिलेने पोलिसांनाच दारूच्या नशेत कारवाई करता, महिलांसोबत असभ्य वर्तन करता म्हणत, वाहनात असलेल्या अंमलदाराच्या दिशेने महिला धावून गेली. चालक नवीन असल्याने त्यांनी वाहन मागे घेतले. याचाच अय्याज आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच, अतिरिक्त फ़ौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत, दोन्ही अंमलदारांची मद्य तपासणी केली. त्यात, ते दोघेही दारूच्या नशेत नसल्याचे स्पष्ट झाले. तर अय्याज हा अभिलेखावरील आरोपी आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
....