पनवेलमध्ये महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: December 18, 2014 23:43 IST2014-12-18T23:43:50+5:302014-12-18T23:43:50+5:30

बारमध्ये वेटरचे काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना पनवेल परिसरामध्ये झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुकुंद क्षीरसागर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman raped in Panvel | पनवेलमध्ये महिलेवर बलात्कार

पनवेलमध्ये महिलेवर बलात्कार

नवी मुंबई : बारमध्ये वेटरचे काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना पनवेल परिसरामध्ये झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुकुंद क्षीरसागर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीने २००८ मध्ये आत्महत्या केल्याने पीडित महिला बारमध्ये नोकरी करत होती. पनवेल परिसरात मुलांसोबत रहात होती. बारमधील वेटर मुकुंद क्षीरसागर याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिसाद न दिल्याने त्याने तिला धमकावण्यास सुरवात केली. बदनामी करण्याची धमकी देऊन २००९ ते डिसेंबर २०१४ दरम्यान अनेक वेळा अतिप्रसंग केला. मुलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. पनवेल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

Web Title: Woman raped in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.