मुंबई : एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने ५५ वर्षाच्या गतिमंद महिलेवर १२ दिवस अत्याचार केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी राम पारसनाथ (३५) याला वांद्रे पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.संबंधित महिला पतीपासून विभक्त रहाते. घर लहान असल्याने तिची मुलगी ही शेजारच्याच इमारतीत तिच्या मावशीकडे राहते. शनिवारी रात्री १२.३०च्या दरम्यान मुलीने पारसनाथला आईच्या घरी जाताना पाहिले. त्यामुळे तिला संशय आला आणि याबाबत तिने आईला विचारणा केली. तेव्हा पारसनाथ तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने मुलीला सांगितले. मुलीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या १२ दिवसांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वांद्रेत गतिमंद महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 02:42 IST