Join us

महिलेवर हॉटेलमध्ये बलात्कार! व्हिडीओ क्लिप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 04:57 IST

पश्चिम उपनगरातील एका विवाहितेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची घटना उघडकीस आली आहे. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत दहिसर पोलीस ठाण्यात योगेंद्र भागवले नावाचा तरुण व त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मुंबई  - पश्चिम उपनगरातील एका विवाहितेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची घटना उघडकीस आली आहे. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत दहिसर पोलीस ठाण्यात योगेंद्र भागवले नावाचा तरुण व त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला.अंधेरीत पतीसह राहणारी मिताली (नावात बदल) गेल्या वर्षी २३ डिसेंबरला कामानिमित्त दहिसरमध्ये योगेंद्र भागवले याला भेटण्यासाठी आली होती. दुपारी तो तिला महाराजा हॉटेलमध्ये घेऊन गेला. कोल्डिंÑकमध्ये गुंगीचे द्रव्य घालून दिले. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने व मित्राने तिच्यावर बलात्कार केला. याचे मोबाइलवर शूटिंग केले. सायंकाळी मिताली शुद्धीवर आल्यानंतर बदनामी होईल, म्हणून तिने कोणालाही घडलेला प्रकार सांगितला नाही. मात्र, काही दिवसांनंतर भागवलेने तिचा ईमेल, फेसबुक व टिष्ट्वटर अकाउंट हॅक केले. त्यावर व्हिडीओ क्लिप अपलोड केली. हा प्रकार समजल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

टॅग्स :बलात्कारमहिलागुन्हा