महिला प्रवाशांनो सावधान! दरवाजाजवळ लटकू नका

By Admin | Updated: August 18, 2014 02:01 IST2014-08-18T02:01:16+5:302014-08-18T02:01:16+5:30

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर चोरीच्या उद्देशाने हल्ले होत असून, त्यांचा प्रवास अजूनही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे

Woman Passengers Attention! Do not hang near the door | महिला प्रवाशांनो सावधान! दरवाजाजवळ लटकू नका

महिला प्रवाशांनो सावधान! दरवाजाजवळ लटकू नका

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर चोरीच्या उद्देशाने हल्ले होत असून, त्यांचा प्रवास अजूनही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यातील गुरुवारी लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशावर ट्रॅकवर उभे असणाऱ्या चोरांनी हल्ला केला. यात महिला प्रवासी ट्रॅकवर पडताच जबर मारहाण करून त्यांच्याजवळील वस्तू घेऊन चोरांनी पोबारा केला. या घटनेनंतर दरवाजाजवळ लटकणाऱ्या महिला प्रवाशांना रेल्वे पोलिसांकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ट्रॅकवर असणाऱ्या या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे पोलीस अशा ठिकाणांची माहिती घेऊन त्यांची धरपकड करणार आहेत.
१४ आॅगस्ट रोजी गोरेगावला घरी परतण्यासाठी तनुजा यादव (२३)
यांनी बोरीवली स्थानकातून धीमी लोकल पकडली. रात्री साडेआठच्या सुमारास ही लोकल गोरेगाव स्थानकाजवळ १00 मीटर जवळ आली असतानाच महिला डब्यात लोकलच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या तनुजा यादव यांना रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या दोन जणांनी जोरदार फटका मारला. लोकल थोडी पुढे जाताच यादव यांचा तोल
गेला आणि त्या लोकलमधून पडल्या. त्याच वेळी दोन चोरांनी यादव
यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पर्स तसेच मोबाइल हिसकावून घेतला. दोन ते तीन प्रवाशांनी यादव यांना तत्काळ जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Woman Passengers Attention! Do not hang near the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.