धूर येत असल्याचे पाहून तरुणीची लोकलमधून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 04:30 IST2020-01-10T04:30:44+5:302020-01-10T04:30:49+5:30
हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकावर उभ्या लोकलमधून एअरप्रेशर ब्रेकमुळे धूर निघाला.

धूर येत असल्याचे पाहून तरुणीची लोकलमधून उडी
मुंबई : हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकावर उभ्या लोकलमधून एअरप्रेशर ब्रेकमुळे धूर निघाला. हे पाहून अनेक प्रवाशांनी लोकलमधून उडी घेतली. यात एका तरुणीने उडी घेतल्याने ती जखमी झाली. या तरुणीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दुपारी १२.३०च्या सुमारास हार्बर मार्गावर सीएसएमटीकडून पनवेलला जाणारी लोकल वडाळा स्थानकात फलाट क्रमांक १ वर आली. ती थांबली असता, एअरप्रेशर ब्रेकमुळे धूर निघाला. हा धूर पाहून अनेक प्रवाशांनी लोकलमधून उडी घेतली. यामध्ये काही प्रवाशांचे मोबाइल पडले. टिष्ट्वटकल बेनिकड्डी (२२) या तरुणीने लोकलमधून फलाटावर उडी घेतली. यात ती जखमी झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी दिली.