महिला डॉक्टरला घरात कुटुंबीयांसह मारहाण
By Admin | Updated: July 4, 2015 23:31 IST2015-07-04T23:31:32+5:302015-07-04T23:31:32+5:30
एका डॉक्टर महिलेसह त्यांच्या कुटुंबियांना रात्रीच्या सुमारास घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना शास्त्रीनगर या भागात शुक्रवारी रात्री घडली.

महिला डॉक्टरला घरात कुटुंबीयांसह मारहाण
वाडा : एका डॉक्टर महिलेसह त्यांच्या कुटुंबियांना रात्रीच्या सुमारास घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना शास्त्रीनगर या भागात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. सुधीर पाटील व प्रवीण जाधव अशी आरोपींची नावे असून दोघेही फरारी आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाडा गावातील शास्त्रीनगर येथील साधना अपार्टमेंट या इमारतीत डॉ. ममता पाटील या आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी दि. ३ रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे कुटुंब झोपले असताना वरील आरोपींनी डॉक्टरांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर डॉक्टरांचे पती जयेश पाटील यांनी दरवाजा उघडला असता सुधीर व प्रविण हे दोघे आरोपी तिथे उभे होते. त्यातील सुधीर यांनी रामचंद्र पाटील कोठे आहेत त्यांना बोलवा असे म्हणू लागले व तसे म्हणता म्हणता ते घरामध्ये घुसले. घरात आरडाओरड झाल्याने घरातील सर्वजण झोपेतून उठले. सुधीर हा हॉलमधून किचनमध्ये जात असताना त्याला डॉ. ममता यांनी अडविले असता सुधीर याने डॉक्टरांच्या डोक्यावर ठोसा मारून जखमी केल. त्याच झटपटीत त्यांच्या गळ्यातील चेन तुटून गहाळ झाली. त्यानंतर डॉक्टरांचे सासरे रामचंद्र, पती जयेश व दीर चेतन यांनाही वरील दोघा आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर नागरिक जमा झाले असता वरील दोघांनी पळ काढून डॉक्टर कुटुुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.