मोलकरीण बनून चोरी करणाऱ्या महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST2021-06-18T04:06:32+5:302021-06-18T04:06:32+5:30
मुंबईत ५० हून अधिक गुन्हे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोलकरीण बनून घरात चोरी करणाऱ्या महिलेला मालमत्ता कक्षाने अटक ...

मोलकरीण बनून चोरी करणाऱ्या महिलेला अटक
मुंबईत ५० हून अधिक गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोलकरीण बनून घरात चोरी करणाऱ्या महिलेला मालमत्ता कक्षाने अटक केली. मुंबईत तिच्यावर ५० हून अधिक गुन्हे नोंद आहेत. वनिता ऊर्फ सुनीता ऊर्फ संगीता ऊर्फ आशा ऊर्फ नीशा उर्फ उषा गायकवाड अशा वेगवेगळ्या नावांनी ती वावरत होती.
विलेपार्ले येथील गुलमोहर रोड परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराच्या घरातून १० हजार आणि अडीच हजार डॉलर चाेरून तिने पळ काढला होता. याप्रकरणी २६ मे रोजी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. मालमत्ता कक्षानेही याचा समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजवरून ती अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने शिवाजीनगर परिसरात ५ दिवस पाळत ठेवून तिला अटक केली. ती वेगवेगळ्या नावांनी वावरत होती. चोरी केल्यानंतर राहण्याचा पत्ताही ती बदलत होती. तिला पुढील तपासासाठी जुहू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
........................................