‘त्या वेळचे वेडेपण आज हरवले’
By Admin | Updated: August 14, 2014 01:37 IST2014-08-14T01:37:07+5:302014-08-14T01:37:07+5:30
अत्रे, पुरंदरे व मंगेशकर या तिन्ही घराण्यांचे नाते खूप जुने आहे. दीनानाथ मंगेशकरांची नाटके मी पाहिली आहेत

‘त्या वेळचे वेडेपण आज हरवले’
मुंबई : अत्रे, पुरंदरे व मंगेशकर या तिन्ही घराण्यांचे नाते खूप जुने आहे. दीनानाथ मंगेशकरांची नाटके मी पाहिली आहेत. अत्रे, मंगेशकर व मी वेगळे जीवन जगलो. तो काळच वेगळा होता आणि त्या वेळचे वेडेपण आज कुठे तरी हरवले आहे. ललितकला आज रुसली की काय, असे वाटायला लागले आहे, अशा भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला, त्या वेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी हे मत व्यक्त केले. मंगेशकर कुटुंबीयांविषयी बाबासाहेब म्हणाले, मंगेशकरांची पाच अपत्ये ही सरस्वतीचीच मुले आहेत. सत्काराला उत्तर देताना, हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, या पुरस्कारावर माझा अधिकारच होता. कारण मी अत्रेंच्या घरातला आहे. ज्या व्यक्तींचे गाणे मी नवव्या वर्षी गायलो. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला, हे माझे भाग्य आहे. (प्रतिनिधी)