Join us

प्रजासत्ताक दिनी भर समुद्रात रंगणार यॉटचा थरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 12:47 IST

26 जानेवारी हा आपल्यासाठी प्रजासत्ताक दिन म्हणूनच ओळखीचा. मात्र, हा दिवस जगभरात कस्टम डे म्हणूनही साजरा केला जातो.

मुंबई : 26 जानेवारी हा आपल्यासाठी प्रजासत्ताक दिन म्हणूनच ओळखीचा. मात्र, हा दिवस जगभरात कस्टम डे म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी मुंबईच्या समुद्रात एक नौका नयनाची स्पर्धा रंगते. यंदाही या कस्टम कप रेगाटा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यामध्ये देशातील लष्कर, नौदलासह नावाजलेले यॉट क्लब भाग घेत असतात. कॉर्पस ऑफ मिलिटरी इंजिनिअर्स, आर्मी यॉटिंग सेंन्टर, नेव्हल सेलिंग क्लब, इंजियन कस्टम आणि रॉयल बॉम्बे यॉट क्लब सारख्या संघांचाही सहभाग असतो. दि बॉम्बे कस्टम यॉट क्लब या स्पर्धेचे आयोजन करतो. 

या स्पर्धेमध्ये नौदल, लष्करातील अनेक पदक प्राप्त अधिकारी सहभागी होतात. देश-विदेशात बनविलेल्या नौकांचा यावेळी वापर केला जातो. गेल्या वर्षी 45 नौका सहभागी झाल्या होत्या. यंदा यामध्ये कमालीची भर पडली असून 60 नौकांनी सहभाग नोंदविला आहे. 

कुठे सुरु होणार हा थरार...26 जानेवारीला दुपारी 2 वाजता गेटवे ऑफ इंडियाकडून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या सर्व नौकांना शिड लावण्यात येणार आहे. त्यामुळे वाऱ्य़ाच्या दिशेवरून नावाड्यांना मार्ग शोधताना कसब पणाला लावावे लागणार आहे. 

टॅग्स :बोट क्लबप्रजासत्ताक दिन