Join us
Daily Top 2Weekly Top 5

खड्डयात पडून दुर्घटना घडल्यानंतर उपाय करणार का? गोरेगावच्या माजी नगरसेविका संतापल्या

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 21, 2025 17:48 IST

गोरेगाव (पूर्व ) गोकुळधाम कृष्ण वाटिका रोडवर मलनि:स्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबईगोरेगाव (पूर्व ) गोकुळधाम कृष्ण वाटिका रोडवर मलनि:स्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. पण या ठिकाणी केलेल्या पालिका प्रशासनाने खोदकामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा विषयक नियमांचे पालन केलेले नाही. बेरेकेट्स देखिल लावले नव्हते? येथे  २० फूटी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात लहान मूल आणि कुणाचा पडून काही दुर्घटना झाल्यानंतर पालिका प्रशासन जागे होणार का? कंत्राट दारावर काय करवाई केली, त्याला किती दंड लावला असा सवाल करत प्रभाग क्रमांक ५२च्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी पी दक्षिण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केला आहे. त्यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत संताप व्यक्त केला. आपण आवाज उठवल्या नंतर येथे बेरेकेट्स लावण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी काय करतात? मी त्या स्थळाला भेट देऊन अधिकाऱ्यांना फोन केला, तेव्हा त्यांना जाग आली. मग कुणाचा बळी गेल्यानंतर अधिकारी जागे होणार का? अशा शब्दात त्यांनी पालिका प्रशासनाला खडे बोल सूनावले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र