- महेश कोलेमुंबई - मध्य रेल्वेच्या अमृत भारत योजनेअंतर्गत परळ रेल्वेस्थानक येथे सुमारे १९ कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या सुविधा पाचव्या व सहाव्या मार्गिकांच्या कामामुळे आता अंशतः हटवाव्या लागण्याची शक्यता आहे. यात नव्या तिकीट बुकींग कार्यालयाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी या स्थानकाचे उद्घाटन झाले होते.
‘प्रस्तावित परळ टर्मिनस प्रकल्पा’ला जोडण्यासाठी पाचव्या व सहाव्या मार्गिकांचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे परळ स्थानकाच्या पूर्वेकडील नवीन इमारत, अद्ययावत तिकीट बुकिंग कार्यालय, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्वच्छतागृहे, मिनी गार्डन, दुचाकी पार्किंग व आसनव्यवस्था अशा सुविधा उभारल्या होत्या. मात्र, मार्गिकांच्या संरेखनामुळे काही सुविधांवर गंडांतर येऊ शकते. मिनी गार्डन हटवावे लागू शकते. तिकीट बुकिंग कार्यालय व पार्किंगला बाधा होऊ नये, यासाठी नियोजन सुरू असले तरी अंतिम आराखडा अद्याप निश्चित झालेला नाही.
वर्कशॉपच्या जागेवर प्रकल्पप्रस्तावित परळ टर्मिनसला मुख्य मार्गाशी जोडण्यासाठी या अतिरिक्त मार्गिका अत्यावश्यक मानल्या जात आहेत. या प्रकल्पामुळे उपनगरीय आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांचे विभाजन होऊन कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. ५०० कोटी रुपयांच्या खर्चाचा हा टर्मिनस जुन्या वर्कशॉपच्या जागेवर उभारला जात आहे. दरम्यान, स्थानकावर फूटओव्हर ब्रिज विस्ताराचे काम सुरू असून एस्कलेटर व जिने उभारले जात आहेत.
या कामांचा समावेशकुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काम वर्कशॉपपर्यंत होणार आहे. पुढील टप्प्यात परळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान (सीएसएमटी) नवीन लाइन टाकताना संरचनांमध्ये बदल अपेक्षित आहेत. नवीन परळ टर्मिनसमध्ये दोन आयलँड प्लॅटफॉर्म, चार प्लॅटफॉर्म लाईन्स (२६ डब्यांच्या गाड्यांसाठी), ६२० मीटरच्या दोन स्टेबलिंग लाइन्स, वाहनांसाठी स्वतंत्र डेक व पार्किंग सुविधा प्रस्तावित आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडशी जोडणारा १५ मीटर रुंदीचा रस्ता, रॅम्प आणि व्हाय डक्ट उभारले जाणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पासाठी नवीन इमारत अडचण ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिचा काही भाग यामध्ये बाधित होण्याची शक्यता आहे.
‘सीएसएमटी’वरील ताण कमी होणार : २०१९ पासून परळला उपनगरीय टर्मिनसचा दर्जा देण्यात आला असून, काही गाड्या येथे वळवण्यात आल्या आहेत. नवीन टर्मिनस उभारल्यानंतर परळ हे मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी महत्त्वाचे इंटरचेंज ठरण्याची शक्यता असून सीएसएमटीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : Paral station's new facilities, built for ₹19 crore and inaugurated by PM Modi, may be partially demolished for fifth and sixth railway lines. The new lines, crucial for the proposed Paral Terminus, could impact the ticket booking office and mini garden, though plans are underway to minimize disruption.
Web Summary : परेल स्टेशन की नई सुविधाएँ, ₹19 करोड़ में निर्मित और पीएम मोदी द्वारा उद्घाटन, पाँचवीं और छठी रेलवे लाइनों के लिए आंशिक रूप से ध्वस्त की जा सकती हैं। प्रस्तावित परेल टर्मिनस के लिए महत्वपूर्ण नई लाइनें, टिकट बुकिंग कार्यालय और मिनी गार्डन को प्रभावित कर सकती हैं, हालांकि व्यवधान को कम करने की योजनाएँ चल रही हैं।