मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला उद्धवसेनेने कडाडून विरोध केला आहे. शिवडीचे आ. अजय चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली उद्धवसेनेच्या नगरसेवक व शिवसैनिकांनी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता संगीता रावत यांची भेट घेऊन नामांतराला विरोध करणारे निवेदन दिले.
दुसरीकडे आ. मिलिंद नार्वेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. केईएम रुग्णालयाचे नाव बदलत असाल तर इतर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. नामांतराविरोधात उद्धवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत.
प्रस्ताव आयुक्तांकडे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक’ रुग्णालय करण्याबाबत पालिकेला पत्र दिले होते. पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला असून, अभिप्रायासाठी तो आयुक्तांकडे पाठविला आहे. याविरोधात आ. अजय चौधरी व पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने अधिष्ठाता रावत यांची भेट घेत निवेदन दिले. मोठे योगदान दिलेल्या व्यक्तीचे नाव सत्ताधाऱ्यांना चालत नाही? पालिकेत मुंबईच्या हिताची कुठली गोष्ट ऐकली जात नाही. केईएमचे नामांतर करू नये. मुख्यमंत्र्यांनी या विषयाबाबत विचार करावा, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
रुग्णालयाच्या अधिष्ठाता रावत यांना निवेदन महाराष्ट्रासह देशातून केईएममध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येतात. २२ जानेवारी २०२६ रोजी रुग्णालयाने १०० वर्षांचा टप्पा पूर्ण केला. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रुग्णालयात जागतिक दर्जाचे डॉक्टर घडले आहेत. ‘केईएम रुग्णालय, परळ’ ही ओळख जगात निर्माण झाली आहे. मंत्री लोढांच्या प्रस्तावाचा निषेध करत आरोग्य समितीने मंजूर केलेला नामांतराचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात नगरसेविका श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, सचिव सुधीर साळवी आदींचा समावेश होता.
केईएम डिस्टर्ब न होण्याची काळजी घेतलीकेईएमच्या नामांतरास विरोध करणाऱ्या ठाकरेंच्या आमदारांनी आम्हाला किंग एडवर्ड आवडतात हे सार्वजनिकरित्या सांगावे. देशात किंग एडवर्डची माळ का जपली जाते? त्यांचे नाव इंग्लडमध्ये ठेवावे. केईएमचे नाव डिस्टर्ब होणार नाही, याची काळजी घेतली आहे, असा पलटवार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नामांतर करण्याचे पत्र लोढा यांनी पालिकेच्या आरोग्य समितीला दिले होते. मागील आठवड्यात समितीच्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, तो अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी शिवडीतील उद्धवसेनेचे आ. अजय चौधरी यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
Web Summary : Uddhav Sena opposes KEM Hospital renaming. MLA Narvekar questions if all historical names will change. Proposal with commissioner. Minister Lodha defends renaming, criticizing Uddhav Sena's stance. Controversy escalates.
Web Summary : उद्धव सेना केईएम अस्पताल के नाम बदलने का विरोध कर रही है। विधायक नार्वेकर ने सवाल किया कि क्या सभी ऐतिहासिक नाम बदल जाएंगे। प्रस्ताव आयुक्त के पास। मंत्री लोढ़ा ने नाम बदलने का बचाव किया, उद्धव सेना की आलोचना की। विवाद बढ़ा।