Join us

राज्यातील सर्व जिल्ह्यांत टेस्ट लॅब सुरू करणार का?- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 22:42 IST

खलिल अहमद वास्ता यांनी याचिकेत म्हटले आहे की, मुंबई, पुणे यांसारख्या रेड झोनमधील लोक रत्नागिरी जिल्ह्यात परत येत आहेत.

मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांत कोविड - १९ टेस्ट लॅब सुरू करण्यासाठी काय करणार आहात?, असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले. रत्नागिरी जिल्ह्यात कोविड - १९ टेस्ट लॅब सुरू करण्यासंदर्भातील जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.

खलिल अहमद वास्ता यांनी याचिकेत म्हटले आहे की, मुंबई, पुणे यांसारख्या रेड झोनमधील लोक रत्नागिरी जिल्ह्यात परत येत आहेत. यावर सरकारी वकील मनिष पाबळे यांनी न्यायालयाला सांगितले की, रुग्णालय नॅशनल अ‍ॅक्रेडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅब (एनएबीएल)च्या निकषाचे पालन करत नाही. या विधानावर न्यायालयाने आक्षेप घेतला.

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबई