‘अॅट्रोसिटी’ची मागणी करेल त्यालाच पाठिंबा!
By Admin | Updated: February 15, 2017 05:12 IST2017-02-15T05:12:12+5:302017-02-15T05:12:12+5:30
जो उमेदवार संविधान तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रखर अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असेल,

‘अॅट्रोसिटी’ची मागणी करेल त्यालाच पाठिंबा!
मुंबई : जो उमेदवार संविधान तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रखर अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असेल, त्यालाच पाठिंबा देण्याचा निर्णय संविधान गौरव बहुजन महामोर्चाने जाहीर केला आहे. येत्या २१ फेब्रुवारीला पार पडणाऱ्या मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात महामोर्चाने ही भूमिका मांडली आहे.
महामोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व न्याय
या त्रिसूत्रीवर ज्याचा विश्वास आहे, अशा उमेदवारालाच पाठिंबा दिला जाईल. शिवाय या त्रिसूत्रीसाठी प्रयत्नरत राहून विभाग स्वच्छ-
सुंदर रोगराईमुक्त, भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा उमेदवाराने करायला हवी. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटत असेल, अशा आंबेडकरी विचारांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महामोर्चाचे कार्यकर्ते प्रयत्न करतील. (प्रतिनिधी)