मुंबई - महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेने संख्याबळाच्या जोरावर शिंदेसेनेवर मात केली असली तरी या दोन्ही पक्षांत आता पालिकेतील पक्ष कार्यालय मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. उद्धवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांना मोठ्या क्षेत्रफळाचे कार्यालय मिळेल. मात्र, शिंदेसेनेला कार्यालय देण्यासाठी प्रशासनाला मध्यम मार्ग शोधावा लागणार आहे.
आपल्या नगरसेवकांना पालिका मुख्यालयात बसण्यासाठी कार्यालय मिळावे, यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. संख्याबळानुसारच कार्यालयांचे वाटप होणार आहे. उद्धवसेनेला मागील वेळेस दिलेले कार्यालय मिळावे, यासाठी शिंदेसेनेचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या कार्यालयाचा काही भाग आपल्या पक्ष कार्यालयासाठी उपलब्ध करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नवीन जागेचा शोध सुरू- भाजपचे ८९ आणि शिंदेसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, शिंदेसेना आणि भाजप हे गट तयार करून नोंदणी करतात की, स्वतंत्र, यावर चर्चा सुरू असली तरी २९ नगरसेवक निवडून आल्याने शिंदेसेनेला पक्ष कार्यालय द्यावे लागणार आहे.- पालिकेतील मागील संख्याबळानुसार शिंदेसेनेच्या वाट्याला काँग्रेसचे कार्यालय येऊ शकते. परंतु, काँग्रेसचेही २४ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांनाही तेवढ्याच क्षेत्रफळाचे कार्यालय द्यावे लागणार आहे. त्यामुळे शिंदेसेनेसाठी नवीन कार्यालयाचा शोध सुरू आहे.- मागील वेळेस उद्धवसेनेचे नगरसेवक जास्त असल्याने त्यांना मोठे कार्यालय देण्यात आले होते. मात्र, यावेळी त्यांचे ६५ नगरसेवक त्यांना दिलेल्या पक्ष कार्यालयाचे क्षेत्रफळ कमी करून शिंदेसेनेला तिथे कार्यालय देता येऊ शकते.
पर्याय नाही- उद्धवसेनेच्या कार्यालयाचा काही भाग कमी करून तिथे शिंदेसेनेचे कार्यालय तयार करता येऊ शकते. परंतु, कोणती जागा हवी आहे किंवा नको, याचा विचार पुढे होऊ शकतो.- काँग्रेस कार्यालयाच्या क्षेत्रफळाएवढे दुसरे कार्यालय नसल्याने उद्धवसेनेला दिलेल्या पक्ष कार्यालयाचा काही भाग कमी केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे बोलले जात आहे.
Web Summary : Following BMC elections, both Shinde and Uddhav Sena factions are vying for office space. Shinde Sena may get a portion of Uddhav Sena's larger existing office due to space constraints. Alternatives being explored.
Web Summary : बीएमसी चुनाव के बाद, शिंदे और उद्धव सेना दोनों गुट कार्यालय स्थान के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं। जगह की कमी के कारण शिंदे सेना को उद्धव सेना का बड़ा मौजूदा कार्यालय का एक हिस्सा मिल सकता है। विकल्प तलाशे जा रहे हैं।