डबेवाले करणार शिवसेनेचा प्रचार
By Admin | Updated: October 7, 2014 23:14 IST2014-10-07T23:14:49+5:302014-10-07T23:14:49+5:30
१२५ वर्षे जेवणाचे डबे पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री व्हावेत म्हणून डबेवाला प्रचारालाही लागला आहे

डबेवाले करणार शिवसेनेचा प्रचार
मुंबई : १२५ वर्षे जेवणाचे डबे पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री व्हावेत म्हणून डबेवाला प्रचारालाही लागला आहे. भाजपा नेत्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे महायुती तुटली तेव्हाच डबेवाल्यांनी शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला; त्यामुळे आता डबेवालेही पुढच्या काळात ‘माझं नाव शिवसेना’ अशी प्रचारमोहीम राबविणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात डबेवाले संपूर्ण मुंबईभर सायकलवरून धनुष्यबाणाची निशाणी लावणार आहेत. तसेच डबे वाहून नेणाऱ्या लाकडी बॉक्सवरती आणि हातगाडीवरती धनुष्यबाणाची निशाणी लावून प्रचार करणार आहेत.
आघाडी सरकारने डबेवाल्यांची कोणतीच कामे केली नाहीत. त्यांनी वेळोवेळी डबेवाल्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. म्हणून आघाडी सरकारबद्दल डबेवाल्यांच्या मनात मोठा रोष आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिजन डॉक्युमेंटमध्ये डबेवाल्यांच्या सर्वांगीण विकासाचा उल्लेख केला आहे. म्हणून डबेवाल्यांना त्यांच्याकडून मोठी आशा निर्माण झालेली आहे. (प्रतिनिधी)