¨हंदमाताची समस्या आता सुटेल?
By Admin | Updated: July 13, 2014 00:34 IST2014-07-13T00:34:24+5:302014-07-13T00:34:24+5:30
यंदाच्या पावसाळ्यातही हिंदमाता, दादर परिसराची परिस्थिती ‘जैसे थे’ आह़े रे रोड येथे ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरही यात काही सुधारणा होण्याची शक्यता धूसर आह़े

¨हंदमाताची समस्या आता सुटेल?
शेफाली परब-पंडित - मुंबई
यंदाच्या पावसाळ्यातही हिंदमाता, दादर परिसराची परिस्थिती ‘जैसे थे’ आह़े रे रोड येथे ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरही यात काही सुधारणा होण्याची शक्यता धूसर आह़े त्यामुळे अशा समस्येवर मिनी पम्पिंग स्टेशनचा उतारा पालिकेने आणला आह़े छोटय़ा पम्पिंग स्टेशनचे काम सरकारी लालफितीत न अडकता तात्काळ पूर्ण होऊन पाणी तुंबण्याच्या समस्येतून सुटका होईल, असा विश्वास अधिका:यांकडून व्यक्त होत आह़े
2क्क्5 मध्ये मुंबईवर ओढवलेल्या पुराच्या संकटानंतर ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पांतर्गत आठ पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ मात्र, गेल्या आठ वर्षामध्ये ईला आणि हाजी अलीवगळता अन्य सहा पम्पिंग स्टेशनची मुदत आणि खर्च वाढत गेला़ पम्पिंग स्टेशनच्या खर्चाचा आकडा आजघडीला साडेतीन हजार कोटींवर पोहोचला आह़े तरीही, माहूल आणि मोगरा पम्पिंग स्टेशनबाबत अद्याप कागदी घोडेच नाचत आहेत़
गेल्याच आठवडय़ात गझदरबंद पम्पिंग स्टेशनचे काम सुरू होऊ शकल़े त्याचबरोबर ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर आह़े परंतु, हिंदमाता तसेच दादर येथील हिंदू आणि पारसी कॉलनीमध्ये आजही पाणी तुंबण्याची समस्या कायम आह़े त्यामुळे दादरमध्ये छोटे पम्पिंग स्टेशन बांधण्याचा पालिकेचा प्रस्ताव आह़े
च्प्रस्तावित पम्पिंग स्टेशन - आठ
च्कार्यान्वित 2 - हाजी अली, ईला
च्काम सुरू - लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅण्ड, ब्रिटानिया, गझदरबंद
च्सरकारी लालफितीत अडकलेले 2 - मोगरा आणि माहूल़
यासाठी छोटय़ा पम्पिंग स्टेशनचा उतारा
रे रोड येथील ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन आणि हिंदमाता यामध्ये सहा किमीचे अंतर आह़े त्यामुळे या पम्पिंग स्टेशनमुळे हंिदूमाता व दादर परिसरातील पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करणो अवघड जात आह़े दादर येथील छोटय़ा पम्पिंग स्टेशनमुळे या परिसराची समस्या सुटून मोठय़ा पम्पिंग स्टेशनवरील ताणही कमी होईल, असा विश्वास पालिकेतील एका वरिष्ठ अधिका:याने व्यक्त केला़
असा होईल पावसाच्या पाण्याचा निचरा़़़
मोठय़ा पम्पिंग स्टेशनमध्ये सहा ते दहा पंप असतात़ त्यामुळे पावसाचे पाणी तुंबल्यास पाण्याचा निचरा तत्काळ होतो़ छोटय़ा पम्पिंग स्टेशनमध्ये दोन ते चार पंप असणार आहेत़ दर सेकंदाला तीन हजार लीटर पावसाचे पाणी उपसण्याची क्षमता प्रत्येक पंपामध्ये असणार आह़े
गेली दोन आठवडे 2क् टक्के पाणीकपातीची झळ सहन करणा:या मुंबईकरांसाठी अखेर एक सुखद खबर आह़े पावसाळी ढग तलाव क्षेत्रत सक्रिय झाले असून, काही तासांमध्येच पाच हजार 639 दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आह़े त्यामुळे टंचाईच्या काळात ही वाढ दिलासादायी ठरणारी आह़े
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोर धरला, मात्र मुंबईला झोडपणा:या पावसाने तलाव क्षेत्रत दडी मारली़ परिणामी तलावांच्या पातळीत सतत घट होत असल्याने अवघ्या 2क्-22 दिवसांचा जलसाठा शिल्लक आह़े त्यामुळे 2 जुलैपासून मुंबईत 2क् टक्केपाणीकपात लागू करण्यात आली़
तलावांची पातळी आणखी खालवत असल्याने ही पाणीकपात दहा टक्क्यांनी वाढणार आह़े मात्र शुक्रवारी रात्रीपासून तलाव क्षेत्रत पावसाने हजेरी लावली आह़े तानसा व भातसा या प्रमुख तलावांमध्ये पावसाची नोंद चांगली आह़े त्यामुळे गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच तलावांच्या पातळीत वाढ दिसून आली आह़े