मुंबई : मुंबईतील सार्वजनिक पाणपोईंना मोठा सांस्कृतिक वारसा आहे. उन्हाळ्यात वाटसरूंची तहान भागवण्यासाठी काही दानशूर लोकांनी पाणपोई बांधल्या. मात्र, काळाच्या ओघात असंख्य पाणपोईंची नासधूस झाली आहे, तर काही जीर्णावस्थेत आहेत. मुंबई महापालिका १६ कोटी रुपये खर्चून फोर्ट ते वांद्रेपर्यंतच्या १७ पाणपोईंची डागडुजी करून त्यांचे संवर्धन करणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
मुंबईत ब्रिटिश राजवटीत सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. पारशी, गुजराती, जैन, मारवाडी, मराठी अशा विविध समाजातील दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी ठिकठिकाणी पाणपोई बांधल्या. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, एकेकाळी कुलाबा ते शीव या पट्ट्यात शंभराहून अधिक पाणपोई होत्या. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात ३७ ते ४० पाणपोई शिल्लक असून, त्यापैकी २९ पालिकेच्या अखत्यारित आहेत. त्यातील १७ पाणपोईंची डागडुजी संवर्धन तसेच तीन वर्षांची देखभाल पालिका करणार आहे.
साफसफाई, तडे-भेगा भरणे, आधुनिक प्लंबिंग
१. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पाणपोईंची मूळ वास्तुशैली अबाधित ठेवून त्यांचे संवर्धन करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक पाणपोईंची साफसफाई, तडे, भेगा भरणे, तुटलेली वास्तू मूळ स्वरूपात पुन्हा उभारणे, अशी प्राथमिक कामे करण्यात येणार आहेत.
२. ओव्हरहेड टाक्या, आधुनिक प्लंबिंग, शुद्धीकरणासाठी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. जमिनीची रचना बदलली असल्यास किंवा पाणीपुरवठ्याची दिशा बदलण्याची गरज भासल्यास, पाणपोईचे स्थलांतरही करण्यात येईल.
... या पाणपोईंच्या डागडुजीवर भर
सर कावसजी जहांगीर फाउंटन (धोबी तलाव)
रामजी सेटीबा पाणपोई (एस एम चौक)
रामजी सेटीबा पाणपोई (मो. अली रोड)
दोन टाकी पाणपोई
मस्जिद बंदर पाणपोई
चार नाल येथील फाउंटन
जी मानेकजी पटेल पाणपोई
नवाब अयाज अली पाणपोई
सर कावसजी जहांगीर फाउंटन, माझगाव
शेठ देवराम केशवजी कॉन्ट्रॅक्टर पाणपोई (महेश्वरी उद्यान)
एम. व्ही. परुळकर फाउंटन (हिंदू कॉलनी)
सर कावसजी जहांगीर फाउंटन (परळ)
इंदिराबाई सहस्रबुद्धे पाणपोई (कोतवाल उद्यान)
रामजी सेटीबा पाणपोई (शिवाजी पार्क)
रामजी सेटीबा (सेनाभवन)
शाह चापसीभाई रानसे, डॉन मिल (लोअर परळ)
जाफरभाई लुढा चातू पाणपोई (वांद्रे)
Web Summary : Mumbai's BMC will restore 17 historic 'paanpoi' (water fountains) from Fort to Bandra, spending ₹16 crore. These fountains, built by philanthropists, will be renovated with modern plumbing while preserving their original architecture to provide drinking water during summer.
Web Summary : मुंबई बीएमसी फोर्ट से बांद्रा तक 16 करोड़ रुपये खर्च कर 17 ऐतिहासिक 'प्याऊ' (पानी की फव्वारे) को बहाल करेगी। परोपकारियों द्वारा निर्मित, इन फव्वारों का नवीनीकरण आधुनिक प्लंबिंग के साथ किया जाएगा, जबकि गर्मियों के दौरान पेयजल प्रदान करने के लिए उनकी मूल वास्तुकला को संरक्षित किया जाएगा।