....तर लोकल फेऱ्या होणार रद्द , मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:11 AM2018-05-30T02:11:28+5:302018-05-30T02:11:28+5:30

पावसात रेल्वेच्या फे-यांवर परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली आहेत

... will decide if the local fare will be canceled, the Central Railway General Manager's decision | ....तर लोकल फेऱ्या होणार रद्द , मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचा निर्णय

....तर लोकल फेऱ्या होणार रद्द , मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचा निर्णय

मुंबई : पावसात रेल्वेच्या फे-यांवर परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली आहेत. रेल्वेच्या मार्गावरील कल्व्हर्ट आणि नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. हवामान विभाग आणि महापालिका आपत्कालीन कक्षाकडून हवामानाची माहिती घेऊन लोकल फेºया चालविण्यात येतील. अतिपाऊस अथवा हायटाइडचा इशारा मिळाल्यास काही लोकल फेºया रद्द करण्यात येतील. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहून प्रवाशांच्या दृष्टीने सोईस्कर निर्णय घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक दि. क . शर्मा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मध्य रेल्वेसह १५ संस्थांची मान्सून आढावा बैठक मंगळवारी पार पडली. बैठक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शर्मा यांनी ही माहिती दिली. रेल्वे मार्गावरील पाणी भरणाºया प्रमुख ठिकाणी अर्थात, कुर्ला आणि सायन मार्गावर एक हजार क्युबिक मीटर प्रति तास पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे ४२ आणि महापालिकेचे १८ असे एकूण ६० पंप रेल्वे मार्गावर बसविण्यात आले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा १७ अधिक पंप रेल्वेच्या मार्गावर आहेत. रेल्वे मार्गावरील नालेसफाई आणि कल्व्हर्टची दोन वेळा सफाई पूर्ण झाली असून, तिसºयांदा सफाईची कामे सुरू आहेत.२२५

‘बिग बी’ करणार आवाहन
रेल्वे रूळ न ओलांडणे, लोकलच्या पायदानावरून प्रवास न करणे आणि धावती लोकल प्रवास करू नये, अशा जनजागृतीसाठी बिग बी अमिताभ बच्चन रेल्वेच्या लाखो प्रवाशांमध्ये जनजागृती करणार आहे. यासाठी त्यांनी सीएसएमटी येथे रविवारी भेट दिली.यावेळी मध्यरेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी अभियानाबाबत बीग बी यांना माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर मध्य रेल्वेने प्रवासी जनजागृतीसाठी ‘एक सफर रेल के साथ’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांसह मध्य रेल्वे हे अभियान राबविणार आहे. यात बिग बी यांच्या समवेत अभिनेता नसरुद्दीन शाह, दिग्दर्शक निशिकांत कामत, भारत गणेशपुरे, मकरंद अनासपुरे, भाऊ कदम, चिन्मय मांडलेकर, श्रेया बुगडे या कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: ... will decide if the local fare will be canceled, the Central Railway General Manager's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.