आॅगस्टपासून मुंबई मेट्रोचे ‘स्कॅन टू ट्रॅव्हल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 05:57 IST2017-07-27T05:57:12+5:302017-07-27T05:57:17+5:30

अल्पावधीत लोकप्रियतेची उंची गाठलेली मुंबई मेट्रो, देशातील पहिले मोबाइल स्कॅन तिकिटाची सुविधा देण्यास सज्ज झाली आहे. रांगेतून सुटका मिळण्यासाठी मेट्रोच्या वतीने ‘क्यू आर’ कोड तंत्रज्ञानावर आधारित तिकीट यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.

will be star Mumbai Metro's 'scan to travel' | आॅगस्टपासून मुंबई मेट्रोचे ‘स्कॅन टू ट्रॅव्हल’

आॅगस्टपासून मुंबई मेट्रोचे ‘स्कॅन टू ट्रॅव्हल’

मुंबई : अल्पावधीत लोकप्रियतेची उंची गाठलेली मुंबई मेट्रो, देशातील पहिले मोबाइल स्कॅन तिकिटाची सुविधा देण्यास सज्ज झाली आहे. रांगेतून सुटका मिळण्यासाठी मेट्रोच्या वतीने ‘क्यू आर’ कोड तंत्रज्ञानावर आधारित तिकीट यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यामुळे घरबसल्या मोबाइलवरील क्यू आर कोड स्थानकावर स्कॅन करून, इच्छित स्थळी प्रवास करता येणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाची चाचणी सर्व मेट्रो स्थानकांवर सुरू आहे. जर चाचणी यशस्वी झाली, तर आॅगस्ट अखेरीस प्रवाशांना ही सुविधा घेता येणार आहे.
मुंबई मेट्रोच्या स्थानकांतील तिकीट खिडकीवरील रांगेपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी, अ‍ॅपवर आधारित मोबाइल तिकिटाचा यंत्रणा सुरू करणार आहे. यात एकल मार्ग, दुहेरी मार्ग, ट्रिप पास, स्टोअर मूल्य अशा बाबींचा समावेश केलेला आहे. मेट्रो अ‍ॅपवरील लिंक डाउनलोड केल्यानंतर, काही मिनिटांत मेट्रो प्रवासाचे तिकीट क्यू आर कोडच्या स्वरूपात जनरेट होणार आहे. हे तिकीट स्थानकांवरील एन्ट्री आणि एक्झिट स्कॅनरवर स्कॅन करून प्रवास करता येणार आहे.
एका मोबाइलमधून अमर्यादित क्यू आर कोड जनरेट करता येणार आहे, तर तिकिटांचे पैसे भरण्यासाठी मोबाइल वॉलेटचा पर्याय देण्यात आला आहे. मेट्रोच्या अ‍ॅपसह
पेमेंट आॅप्शन देणाºया संबंधित मोबाइल वॉलेट कंपनीच्या अ‍ॅपवरूनदेखील मेट्रोचे तिकीट काढता येणार आहे.

देशातील पहिले मोबाइल स्कॅन तिकीट
मोबाइल स्कॅन तिकीट प्रणालीचा वापर देशात सर्वप्रथम मुंबई मेट्रोने केल्याचा दावा, मुंबई मेट्रोच्या प्रवक्त्यांनी केला आहे. सध्या असलेली टोकन तिकीट यंत्रणा भविष्यातही सुरूच राहणार आहे. देशात सध्या स्मार्टफोन युझर्सची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्मार्ट ग्राहकांसाठी स्मार्ट तिकीट यंत्रणेची गरज आहे.

असा मिळवा ‘क्यू आर’ कोड
मेट्रो अ‍ॅपवरील लिंकवर क्लिक करा. लिंक ओपन झाल्यावर, पर्चेसिंग पार्टवर क्लिक करा. त्यानंतर, प्रवासाचा मार्ग (एकल-दुहेरी) निवडा. प्रवासाचे टप्पे निवडा. तिकिटाचे पैसे अदा करण्यासाठी उपलब्ध आॅप्शनवर क्लिक करा. भाडे दराची कपात झाल्यावर त्वरित आपल्या मोबाइलवर क्यू आर कोड जनरेट होईल. तो कोड संबंधित स्थानकावर स्कॅन करून प्रवास करा.

Web Title: will be star Mumbai Metro's 'scan to travel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.