-मनोज गडनीस, मुंबई एकीकडे वैमानिकांच्या वेळापत्रकातील नवीन नियमांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेली स्थगिती २९ मार्च रोजी संपुष्टात येत आहे आणि दुसरीकडे वैमानिकांची कमतरता या पार्श्वभूमीवर उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात देशातील विमानसेवेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना मनस्ताप
'इंडिगो'ची मार्केट हिस्सेदारी ६३% आहे. याच कंपनीचे नियोजन कोलमडल्याने विमानसेवा विस्कळीत झाली होती. त्यातच अन्य कंपन्यांनी तिकीट दर वाढवले होते. याचा फटका प्रवाशांना बसला होता. याची पुनरावृत्ती उन्हाळी सुट्टी हंगामात होऊ शकते.
हवाई वाहतूक तज्ज्ञांचा काय आहे अंदाज?
गेल्या दहा वर्षांत देशभरात ७५ नवे विमानतळ उभे राहिल्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या विविध योजना राबण्याची घोषणा करीत आहेत.
मात्र, जर वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा पवित्रा डीजीसीएने घेतला, तर वैमानिकांच्या कमतरतेमुळे पुन्हा एकदा विमानसेवा विस्कळीत होऊ शकते, आणि त्याचा त्रास ऐन सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना होऊ शकतो असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
वैमानिकांवर वाढता ताण पाहता डीजीसीएने केले होते नवे वेळापत्रक
वैमानिकांवरील वाढता ताण लक्षात घेता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी नवे वेळापत्रक तयार केले होते.
मात्र, विमान कंपन्यांच्या ताफ्यात असलेल्या वैमानिकांची कमी संख्या लक्षात घेता हे वेळापत्रक सद्यःस्थितीत लागू करणे तार्किक ठरणार नाही, असा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतला होता.
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाचे नियम गेल्या डिसेंबरमध्ये लागू होणार होते. मात्र, विमान कंपन्यांनी नव्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने नियोजन न केल्यामुळे डिसेंबरमध्ये विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती आणि १० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला होता.
Web Summary : Pilot shortage and expiring schedule suspension may disrupt summer flights. Indigo's past issues, potential DGCA action, and new airport expansions add to concerns, possibly impacting passengers during peak travel season.
Web Summary : पायलटों की कमी और समय-सारणी निलंबन की समाप्ति से ग्रीष्मकालीन उड़ानें बाधित हो सकती हैं। इंडिगो के पिछले मुद्दे, संभावित डीजीसीए कार्रवाई और नए हवाई अड्डे के विस्तार से चिंताएं बढ़ रही हैं, जिससे चरम यात्रा के मौसम में यात्रियों पर असर पड़ सकता है।