वालधुनी नदी झाली विषारी
By Admin | Updated: November 29, 2014 22:39 IST2014-11-29T22:39:13+5:302014-11-29T22:39:13+5:30
केमिकलचे टँकर मोठय़ा प्रमाणात ज्वलनशील आणि घातक वायू तयार करणारे केमिकल उघडय़ावर वालधुनीच्या प्रवाहात सोडत असल्याने तिचा प्रवाह आता विषारी झाला आहे.

वालधुनी नदी झाली विषारी
पंकज पाटील ल्ल अंबरनाथ
केमिकलचे टँकर मोठय़ा प्रमाणात ज्वलनशील आणि घातक वायू तयार करणारे केमिकल उघडय़ावर वालधुनीच्या प्रवाहात सोडत असल्याने तिचा प्रवाह आता विषारी झाला आहे. त्यामुळे ती आता केमिकल वाहून नेणारी झाली आहे. अनेक कंपन्यादेखील आपले वाया जाणारे केमिकल सीईटीपी प्लांटमध्ये न पाठविता थेट तिच्या प्रवाहातच सोडतात. हे कमी झाले म्हणून की काय, आता बाहेरचे टँकरदेखील तिच्यातच केमिकल सोडत आहेत. अशा या घातक कृत्यामुळेच विषारी वायूची निर्मिती होऊन त्याचा त्रस आता परिसरातील नागरिकांना होत आहे.
रासायनिक द्रव्यांची वाहतूक करणा:या काही टँकरचालकांनी शनिवारी पहाटे वडोल गावानजीक विषारी रसायन सोडल्याने त्या रसायनाची पाण्यासोबत प्रक्रिया होऊन विषारी वायू तयार झाला. या वायूचा त्रस शेजारी राहणा:या नागरिकांना झाला. मुळात वालधुनी आता विषारी रसायन वाहून नेणारा नाला झाली असून त्यात रसायनाचे प्रमाण वाढले आहे. मलंगगडाच्या डोंगरावरून वालधुनी नदीचा उगम झाला आहे. या नदीच्या पात्रत काकोळे गावानजीक जीआयपी टँक उभारण्यात आले आहेत. या टँकमधील पाण्याचा वापर मिनरल वॉटरसाठी रेल्वे करीत आहे. टँकर्पयत पाण्याचा प्रवाह स्वच्छ आहे. मात्र, त्यानंतर हे पात्र दूषित होत गेले आहे.
अंबरनाथ एमआयडीसी, अंबरनाथ नगर परिषदेच्या भुयारी गटारी, उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यांतील केमिकल आणि उल्हासनगरच्या भुयारी गटार योजनेचा सर्व मल थेट याच वालधुनीत सोडण्यात आला आहे.
एकेकाळी स्वच्छ वाहणारी वालधुनी नदी आता केवळ दूषित झाली नसून विषारी द्रव्य वाहून नेणारा नाला झाला आहे. या नाल्याच्या किना:यावर राहणा:यां नागरिकांना भविष्यात त्याचा वाढता त्रस होणार आहे.
मलनि:सारण प्रकल्प आणि सीईटीपी नावापुरते
नदी आणि खाडीचे प्रदूषण रोखता यावे, यासाठी प्रत्येक नगर परिषद, महानगरपालिका यांना मलनि:सारण प्रकल्प उभारणो बंधनकारक आहे. तशीच अट औद्योगिक क्षेत्रतील केमिकल कंपन्यांनाही आहे. कंपनीतील टाकाऊ केमिकलवर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी (कॉमन इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट) उभारण्यात आले आहे. यामध्ये विषारी रसायनावर प्रक्रिया करून त्यातील घातकता कमी करून ते सोडले जाते. मात्र, या प्रकल्पामध्ये केमिकलवर प्रक्रिया करण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने अनेक कारखानदार आपल्या कंपनीतील टाकाऊ रसायन थेट टँकरचालकांच्या मदतीने वालधुनीत सोडतात. त्यामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील सीईटीपी प्लांट नावापुरते आहेत.
वालधुनी नदी प्राधिकरण नावालाच
मुंबईच्या मिठी नदीच्या धर्तीवर वालधुनी नदीच्या विकासासाठी स्वतंत्र वालधुनी नदी प्राधिकरण स्थापण्याचा प्रस्ताव होता. तसेच नदीचा विकास करण्यासाठी 2क्11 मध्ये 65क् कोटींचा प्रस्तावही तयार केला होता. या नदीचा सव्र्हे करण्यापलीकडे दीडदमडीचे कामही झाले नाही. नदीचा विकास करणो तर सोडाच, उलट ही नदी शहरवासीयांना डोकेदुखी ठरत आहे.
नाल्यातच वाढले अतिक्रमण
वालधुनी नदी घातक होत असतानाही या नदीपात्रत अतिक्रमण करून तेथे रहिवासी राहत आहेत. नदीचे पात्र कमी करून तेथे भराव टाकून थेट मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत.