पतीविराेधात पत्नीने घेतली पाेलिसांत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:07 IST2020-12-29T04:07:40+5:302020-12-29T04:07:40+5:30
मुंबई : अनैसर्गिक संबंधांसाठी आग्रह धरणाऱ्या पतीविरुद्ध अखेर पत्नीने ट्रॉम्बे पोलिसांत सोमवारी धाव घेतली. तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी ...

पतीविराेधात पत्नीने घेतली पाेलिसांत धाव
मुंबई : अनैसर्गिक संबंधांसाठी आग्रह धरणाऱ्या पतीविरुद्ध अखेर पत्नीने ट्रॉम्बे पोलिसांत सोमवारी धाव घेतली. तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
.............................................
सांताक्रूझमध्ये चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या
मुंबई : चोरीच्या आरोपातून तरुणाची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात सांताक्रूझ पश्चिमेकडील मुक्तानंद मैदानात घडली. तिथे आलेल्या सैजाद खान (३०) या तरुणाला लाकडी खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस अधिक तपास करत आहेत.
.............................................
पैशांच्या वादातून मित्राचे अपहरण
मुंबई : पैशांच्या वादातून अल्पवयीन मित्राचे अपहरण करत, बंदूक दाखवून धमकाविल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी समीर कुरेशी, सोनू कुरेशी या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...........................