ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना पत्नीशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:06 IST2021-01-04T04:06:48+5:302021-01-04T04:06:48+5:30

ठाणे : ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे पहिले संपादक मधुकर भावे यांच्या पत्नी, ज्येष्ठ लेखिका मंगला भावे यांचे ...

Wife mourning to senior journalist Madhukar Bhave | ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना पत्नीशोक

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना पत्नीशोक

ठाणे : ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे पहिले संपादक मधुकर भावे यांच्या पत्नी, ज्येष्ठ लेखिका मंगला भावे यांचे रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मधुकर भावे, मुलगी डॉ. मृदुला भावे आणि नातू तनिष्क असा परिवार आहे.

गेली अनेक वर्षे मधुकर भावे हे त्यांच्या पत्नीसह ठाण्यातील समतानगर येथे मुलगी मृदुला भावे यांच्याकडे राहत होते. त्यांचा नातू तनिष्क हा कॅनडामध्ये स्थायिक झाला आहे. मंगला भावे या गेली काही वर्षे आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेऊन गेल्या रविवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकमतची स्थापना झाल्यानंतर मधुकर भावे यांनी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मुंबई, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर आदी ठिकाणी त्यांनी काम केले. मंगला भावे यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत.

फोटो - ०३ मंगला भावे मेलवर पाठवत आहे

Web Title: Wife mourning to senior journalist Madhukar Bhave