Join us  

दारू पिऊन घरी येतो म्हणून बायकोने दिला चोप, पतीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 2:11 AM

चित्ता कॅम्प परिसरातील घटना : दारू पिऊन घरी येत असल्याने केले कृत्य

मुंबई : दारू पिऊन घरी येतो, म्हणून पत्नीने आई आणि बहिणीच्या मदतीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना ट्रॉम्बेतील चित्ता कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी पत्नीसह तिघींनाही अटक केली. रहीम दिलावर खान (३५) असे मारहाणीत मरण पावलेल्या पतीचे नाव आहे. तो चिता कॅम्प परिसरात पत्नीसोबत राहायचा. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे पत्नी सलमासोबत त्याचे खटके उडायचे. गुरुवारी रात्रीही तो नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला. यावेळी सलमाची आई बिलकिश शेख आणि बहीण ताजुनिसा या दोघी घरी आल्या होत्या. दारूच्या नशेत आल्याने सलमाचे पतीसाबेत भांडण झाले. रागाच्या भरात सलमाने आई आणि बहिणीसह त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून सलमाने त्याचे तोंड दाबून ठेवले. या मारहाणीततो गंभीर जखमी झाला. त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव तिघींनी खानला रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झालेचे निदान डॉक्टरांनी करताच, त्याला हृदयविकराचा झटका आला होता, असा बनाव या तिघींनी केला व कुठलीही अन्य वैद्यकीय तपासणी करू न देता मृतदेह घरी आणला. याबाबत, त्याच्या भावाला संशय आल्याने, त्याने पोलिसांना कळविले.

पोलिसांनी तिघींकडे याबाबत कसून चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून मारहाण केल्याचे सलमाने सांगितले. या प्रकरणी पत्नी सलमासह तिच्या आई व बहिणीलाही पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी