रुंदीकरणातील दिरंगाई; महामार्गावर आंदोलन
By Admin | Updated: December 23, 2014 22:23 IST2014-12-23T22:23:18+5:302014-12-23T22:23:18+5:30
पळस्पे ते इंदापूर या ८४ कि.मी. पहिल्या टप्प्याचे काम २०११ पासून सुरु झाले आहे. मात्र हे रुंदीकरण कासवगतीने सुरू आहे.

रुंदीकरणातील दिरंगाई; महामार्गावर आंदोलन
पेण : पळस्पे ते इंदापूर या ८४ कि.मी. पहिल्या टप्प्याचे काम २०११ पासून सुरु झाले आहे. मात्र हे रुंदीकरण कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे जून २०१४ मध्ये हा ८४ कि.मी. कामाचा पहिल्या टप्प्याची मुदत निघून गेली. महामार्गावर दररोज होणाऱ्या अपघातामुळे आतापर्यंत याठिकाणी अनेकांचे बळी गेले असून महामार्गाचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्थानिक पत्रकारांनी मंगळवारी आंदोलन केले.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ कि.मी. टप्प्याचा ९४२ कोटीचा हा प्रकल्प बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर आहे. या कामाच्या बदल्यात २१ वर्षे टोल वसुली असे कामाच स्वरुप होते. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रायगड प्रेस क्लब व मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ २९ डिसेंबर रोजी मंत्रालयात भेट घेणार आहेत.