रस्ता रूंदीकरणाने नागरीकांना दिलासा
By Admin | Updated: January 27, 2015 23:03 IST2015-01-27T23:03:42+5:302015-01-27T23:03:42+5:30
गेली अनेक वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत असलेल्या अजीव यशवंत पाटील हे या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. तत्कालीन विरार नगरपरिषदेमध्ये सलग चार वर्षे

रस्ता रूंदीकरणाने नागरीकांना दिलासा
वसई : गेली अनेक वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत असलेल्या अजीव यशवंत पाटील हे या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. तत्कालीन विरार नगरपरिषदेमध्ये सलग चार वर्षे बांधकाम समिती सभापती व आता महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांनी सलग दोन वर्षे काम केले आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना त्यांनी सुमारे ६०० ते ७०० कोटीच्या आर्थिक निधीचे वाटप केले. त्यामुळे स्वत:च्या प्रभागासहीत अन्य प्रभागामध्येही विकासकामांना चांगला निधी उपलब्ध होऊ शकला.
प्रभाग क्र. २१ हा विरार पूर्वेस असून लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून दाटीवाटीचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. अनेक प्रलंबित विकासकामे त्यांनी गेल्या साडेचार वर्षात मार्गी लावली. सुमारे २५ कोटी रू. चा आर्थिक निधी विकासकामी खर्च केला. त्यामध्ये रस्ता रूंदीकरण, जलवाहिन्यांची दुरूस्ती, भूमिगत गटारे, कालबाहय झालेले वीज पुरवठ्याचे साहित्य बदलणे, महिलांसाठी विविध योजना राबवून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे अशी विविध विकासकामे त्यांनी आपल्या कार्यकालात केली. याचसाठी महिला बालविकास विभागालाही त्यांनी निधी दिला. त्यामुळे महिला बचतगटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी भविष्यात विविध योजना राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात अनेक वेळा त्यांनी राज्यशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अतिरीक्त धरण उभारण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
त्यासाठी वेळोवेळी त्यांनी मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या. हे धरण लवकरात लवकर व्हावे याकरीता त्यांनी गेल्या अंदाजपत्रकातही भरीव आर्थिक तरतुद केली होती.