वायफायच्या सुविधेला रविवारचा मुहूर्त

By Admin | Updated: July 24, 2014 23:57 IST2014-07-24T23:57:11+5:302014-07-24T23:57:11+5:30

स्मार्ट फोन, टॅबच्या वाढत्या वापराने तरुण पिढीला मोबाइलवरील इंटरनेट अनिवार्य ठरू लागले आहे. असंख्य अॅप वापरण्यासाठी गतिमान वायफाय असेल तर उपयोग होऊ शकतो.

Wi-Fi facility Sunday's Muhurat | वायफायच्या सुविधेला रविवारचा मुहूर्त

वायफायच्या सुविधेला रविवारचा मुहूर्त

डोंबिवली : स्मार्ट फोन, टॅबच्या वाढत्या वापराने तरुण पिढीला मोबाइलवरील इंटरनेट अनिवार्य ठरू लागले आहे. असंख्य अॅप वापरण्यासाठी गतिमान वायफाय असेल तर उपयोग होऊ शकतो. अभ्यासाच्या नोट्स व लेरसंबंधी माहिती व दैनंदिन वेळापत्रकासारख्या गोष्टीही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर होत असल्याने वायफाय ही चैन नसून गरज बनली आहे.
केवळ हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून डोंबिवलीतील तरुणाईचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या फडके रोडवर फ्री वायफाय सेवा रविवार, 27 जुलै रोजी कार्यान्वित होत आहे.  आमदार रवींद्र चव्हाण, चित्रपट अभिनेते सुशांत शेलार, जयंत वाडकर आणि मॉडेल मधू शर्मा यांच्या उपस्थितीत फ्री वायफाय लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. 
शहरात 4 ठिकाणी वायफाय सुरू करण्याचे ठरवले असून फडके रोडनंतर मानपाडा रोड, भागशाळा मैदान परिसर, पेंढरकर कॉलेज व घरडा सर्कल परिसर येथे काही दिवसांत फ्री वायफाय सुरू करणार आह़े संपूर्ण देशात इंटरनेट सुविधा देणा:या एका कंपनीने ही सेवा देऊ केली असून सदर कंपनी इंटरनेट सेवा पुरवठादारांच्या ‘अ’ वर्ग श्रेणीतील कंपनी आहे. देशभर कुठेही इंटरनेट सुविधा पुरवण्याकरिता या कंपनीकडे परवाना आहे. वायफाय सेवा सुरक्षित असून लॉग इन आयडीशिवाय इंटरनेट सर्फिग करता येणो शक्य होणार नाही़ (प्रतिनिधी)
 
च्कल्याण शहरात वायफाय सुविधा सुरू करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र मुंबईसह सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत पाहावयास मिळाले असताना आता ऐतिहासिक कल्याण शहरामध्येही मनसेने आघाडी घेऊन येत्या ऑगस्टपासून वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली आहे. 
च्लोकसभा निवडणुकीमध्ये तरुणांचे मतदान महत्त्वाचे ठरले. आजघडीला तरुणांकडून मोबाइल आणि इंटरनेटचा मोठय़ा प्रमाणावर होत असलेला वापर पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी वायफायचा फंडा अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे.
 
च्मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात वायफायवरून मनसे आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगल्याचे पाहावयास मिळाले, तर डोंबिवली शहरातही मनसे आणि भाजपामध्ये वायफाय देण्यावरून श्रेयाची लढाई रंगली आहे. 
च्वायफायवरून चढाओढ सुरू असताना कल्याण नगरीतही ही सुविधा देण्यासाठी आता मनसेने पुढाकार घेतला आहे. 
 
च्पक्षाच्या विद्यार्थी शाखेचे कल्याण लोकसभा क्षेत्रचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात ही सेवा सर्वासाठी उपलब्ध होईल, असा दावा केला आहे. 
च्मनसेच्या या घोषणोनंतर अन्य राजकीय पक्षही या स्पर्धेत उतरण्याची शक्यता असल्याने येथेही वायफायवरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

 

Web Title: Wi-Fi facility Sunday's Muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.