Join us  

प्रदूषणाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 1:04 PM

शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकासकामे, बांधकामे, वाहनांची वाढती संख्या यामुळे हवेतील बदल आणि गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे.

मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकासकामे, बांधकामे, वाहनांची वाढती संख्या यामुळे हवेतील बदल आणि गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. प्रदूषणासाठी धूळ हा घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून अप्लाय परिसरातील वायू प्रदूषणाच्या तक्रारी तत्काळ पालिकेकडे करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या तक्रारी पालिकेच्या मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाइनवरच करायच्या असल्याने काही पर्यावरणप्रेमींनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाइन - ८१६९६-८१६९७, अ‍ॅप - माय बीएमसी २४*७, हेल्पलाइन क्रमांक - १९१६ आणि www.portal.mcgm.gov.in येथे तक्रार करता येणार आहे.

पालिकेकडून आवाहन:नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बांधकामांबाबत, बांधकामासाठी वापरली जाणारी वाहने, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना केल्या आहेत. नागरिकांनी पालिकेला वायू प्रदूषणाच्या कोणत्याही तक्रारीसंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. 

जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याची भर:मुंबईतील हवेच्या प्रदूषणात सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा आणखी भर टाकत आहे. त्यामुळे मुंबईत कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्यांची तक्रार थेट स्वच्छ मुंबई हेल्पलाइनवर करा. महापालिका अशा लोकांवर कारवाईचा करणार आहे.

टॅग्स :मुंबईप्रदूषण