Join us  

लहान, मोठ्या सलूनला कायदा वेगवेगळा का?; बऱ्याच ठिकाणी उशिरापर्यंत सलून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 2:22 AM

प्रस्थापित सलूनना वेळ आणि दिवसाचे बंधन नाहीच

मुंबई : जवळपास साडेतीन महिन्यांनी सलून, ब्युटीपार्लर उघडण्याची परवानगी काही निर्बंध घालत सरकारने दिली आहे. हे नियम लहान किंवा काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या सलूननाच लागू करत तीनच दिवस ‘शटर’ उघडण्याची जबरदस्ती करण्यात येत आहे. मोठ्या आणि जुन्या सलूनना सर्व प्रकारची सूट असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत तग धरणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.

लहान किंवा काही महिन्यांपूर्वी सुरूझालेल्या सलूनला आठवड्यातून फक्त तीन दिवसच सुरू ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर वेळेचेही बंधन आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र याउलट गेल्या अनेक वर्षांपासून जम बसविलेल्या आणि बºयापैकी प्रस्थापित सलूनना मात्र सातही दिवस आणि रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवसच काम सुरू ठेवणे या सलूनना परवडत नसून यामुळे त्यांना तग धरणे कठीण होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

भाडे तर महिन्याचेच घेणार!‘आम्हाला आठवड्यात तीन दिवस सलून चालवायला देणार, मात्र जागामालक भाडे मात्र महिन्याभराचे घेणार, त्यामुळे तीन दिवस सलून आणि पार्लर चालवून भाडे आणि सहकाऱ्यांचा पगार कसा उभा करणार,’ हा सवालही त्यांच्याकडून विचारला जात आहे.

त्यापेक्षा ‘होम सर्व्हिस’ बरी...‘सलून तीन दिवसच चालवायचे असेल तर त्यापेक्षा आम्ही ‘होम सर्व्हिस’ करू. त्यामध्ये आम्हाला दोन पैसे जास्तीचे तरी मिळतील आणि गाळ्यात सलून चालवून लाइट बिल व जागेचे भाडे उभे करण्याचा प्रश्नही उपस्थित होणार नाही.

चार आने की मुर्गी आणि...ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कोणतीही सर्व्हिस पुरवताना पीपीई किट देण्याचे निर्देश सलून चालकांना देण्यात आले आहेत. मोठे सलून यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारतात. मात्र लहान सलूनला हा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे.कारण पीपीई किटचा खर्च ग्राहकांकडून मागितला तर जे येतात तेही आमच्याकडे पाठ फिरवतील. कारण सध्या फक्त हेअर ट्रीटमेंट, वॅक्स्ािंगसारख्याच सर्व्हिस देण्यास सलूनला परवानगी असून फेशियल, मसाज, टचअपसारख्या बॉडी सर्व्हिस ते देऊ शकत नसल्याने त्यांना पीपीई किटचा खर्च परवडत नाही.शासनाच्या निर्बंधांचे पालन कराबºयाच प्रयत्नांनंतर शासनाने सलून आणि पार्लर उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच त्यासाठी काही निर्बंधही घातले आहेत. त्यामुळे त्यांचे योग्य ते पालन करा. आठवड्यातून तीन दिवस आणि सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सलून सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तसेच पीपीई किटसारख्या सुरक्षाव्यवस्था सलून करत असल्याने यासाठी बिलात ३० ते ४० टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आली असून यासाठी ग्राहकांनीही सहकार्य करावे. तसेच कर्मचाºयांना आर्थिक मदतही द्यावी. - प्रकाश चव्हाण, सचिव, सलून ब्युटीपार्लर

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस