Join us  

‘बेस्ट’ वीज विभागाचा नफा ‘परिवहन’ला का देता?, दरवाढीवर मनसे कडाडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 2:54 AM

मुंबईकरांवर लादल्या जाणाऱ्या वीज दरवाढीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला आहे. म

मुंबई : महावितरण, अदानी आणि टाटा पॉवरने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचे प्रस्ताव सादर केले असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता बेस्टच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे. मुंबईकरांवर प्रस्तावित दरवाढीचा बोजा पडणार नाही, यावर आमचा विश्वास असल्याचे म्हणणे मनसेने मांडले आहे.

मुंबईकरांवर लादल्या जाणाऱ्या वीज दरवाढीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला आहे. मनसेने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवून या पत्रात ‘बेस्ट’ वीज विभागाचा नफा ‘परिवहन’ला का देता? असा प्रश्नही केला आहे. शिवाय मुंबईकरांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार नाही; याची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे. बेस्ट विद्युत पुरवठा विभागाला होणारा नफा परिवहन विभागाला वळते करत आहे. असे करण्यात येऊ नये, असे आदेश काढावे, अशी मागणी पत्राद्वारे केली.

परिवहन विभागाबाबत महाविकास आघाडी उदासीन आहे. बेस्ट परिवहनचा तोटा पालिकेने भरावा. वीज विभागाचा नफा परिवहनला देऊ नये, असे मनसेचे म्हणणे आहे. दरम्यान, परिवहन विभागाला कर सवलत, अनुदान, टोलमाफी दिली जात नाही. पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टच्या परिवहन विभागाचा अर्थसंकल्प विलीन केला जात नाही. परिणामी, तोटा वाढत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठी दाखल वीज दरवाढीच्या प्रस्तावात सरासरी १ ते ५ टक्के वाढ दर्शविल्याचे महावितरणचे म्हणणे असले, तरी दरवाढीचा प्रस्ताव थेट २० टक्के असल्याचे म्हणणे वीजतज्ज्ञ आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी मांडलेआहे.४ फेब्रुवारी रोजी जनसुनावणी घेण्यात येणारअदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर या दोन्ही वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी विजेच्या दरात वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावानुसार, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी होणार असून, टाटा पॉवरच्या वीजदरात मात्र वाढ होणार आहे. परिणामी, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार असून, टाटा पॉवरच्या ग्राहकांना विजेचा झटका बसणार आहे. दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कफ परेड येथील वर्ल्ड टेÑड सेंटर येथील सेंट्र्युम हॉलमध्ये वीज दरवाढीवर जनसुनावणी होईल.

टॅग्स :राज ठाकरेबेस्ट