Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या ७८ व्या महापौर कोण? ११ फेब्रुवारीला नाव कळणार! ७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 23:53 IST

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईला ७८ वा महापौर मिळणार आहे. या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, ११ फेब्रुवारीलाच दुपारी १२ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात नवीन महापौरांची निवड केली जाईल. विशेष म्हणजे, यंदा हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने मुंबईच्या महापौरपदी पुन्हा एकदा 'महिला राज' पाहायला मिळणार आहे.

निवडणुकीचं वेळापत्रक कसं असेल? 

७ फेब्रुवारीपासून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. ११ फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदानापूर्वी १५ मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रशासकाचा काळ संपल्यानंतर आता लोकनियुक्त सभागृहात ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे.

भाजपचे पारडे जड; कोण होणार महापौर? 

१५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) २९ जागा मिळाल्या आहेत. यामुळे महायुतीकडे स्पष्ट बहुमत (११८ जागा) असून, दोन्ही पक्ष पुढील महापौर म्हणून त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सज्ज आहेत. .

विरोधकांची भूमिका काय? 

दुसरीकडे, शिवसेनेने (ठाकरे गट) ६५ जागा जिंकल्या, तर मनसेला फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी रोजी झाले आणि निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai's Next Mayor to Be Announced February 11th

Web Summary : Mumbai will elect its 78th mayor on February 11th. Nomination starts February 7th. The mayoral seat is reserved for a woman. BJP leads with 89 seats, allied with Shiv Sena (Shinde) for majority.
टॅग्स :महापौरमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई