Join us

उत्तर मुंबईतील 17 हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 14:11 IST

२४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. अशात जनरेशन अल्फा किंवा जनरेशन झेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीला विशेष महत्त्व आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या १७ हजार ६३१ आहे. एकूण संख्येपैकी नवमतदार केवळ ०.९९ टक्के  आहेत. त्यामुळे अधिकाधिक नावनोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने २४ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. 

१८ ते २५ हा वयोगट लोकसंख्येतला सर्वाधिक सक्रिय वयोगट मानला जातो. कुमार वय ओलांडून तारुण्यात प्रवेश केलेल्या या वयोगटाची स्वप्ने मोठी असतात. बऱ्याचदा  घडणाऱ्या राजकारणातील घडामोडी, त्यातील निर्णय याचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे कोण निवडून येईल? कोणाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्यायला हवी याचा निर्णय ते अधिक योग्य पद्धतीने घेऊ शकतात. त्यामुळे नवमतदारांचे मतदान हे लोकशाहीला भक्ती देत असते. 

टॅग्स :मुंबईमतदान