नवी मुंबईत कोणाची बाजी ?

By Admin | Updated: October 19, 2014 01:15 IST2014-10-19T01:15:35+5:302014-10-19T01:15:35+5:30

सर्वच प्रमुख पक्षांनी बेलापूर व ऐरोलीची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे.

Who is the bet in Navi Mumbai? | नवी मुंबईत कोणाची बाजी ?

नवी मुंबईत कोणाची बाजी ?

नवी मुंबई : सर्वच प्रमुख पक्षांनी बेलापूर व ऐरोलीची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. कोण जिंकणार याविषयी सर्वानाच उत्सूकला लागून राहिली असून पदाधिका:यांनी मात्र विजयानंतर जल्लोषाची तयार करून ठेवली आहे. 
नवी मुंबईमधील दोन्ही मतदार संघामध्ये अटीतटीची लढत आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व ठेवणारे गणोश नाईक त्यांच्या पारंपरिक बेलापूर मतदार संघातून पुन्हा रिंगणात असून त्यांच्याविरोधात शिवेसेनेचे विजय नाहटा, भाजपाच्या मंदा म्हात्रे, काँग्रेसचे नामदेव भगत यांनी आव्हान उभे केले आहे. गतवेळी नाईक यांचा 12 हजार मतांनी विजय झाला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेने 25 हजार मतांची आघाडी घेतली होती. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते गणोश नाईक  या मतदार संघात उभे असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. 
ऐरोली मतदार संघामध्ये विद्यमान आमदार संदीप नाईक यांच्याविरोधात शिवसेनेचे विजय चौगुले, भाजपाचे वैभव नाईक, काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे यांची लढत आहे. गत निवडणुकीमध्ये संदीप नाईक 11 हजार 957 मतांनी विजयी झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये येथेही शिवसेनेला 2क् हजार 4क्क् मतांची आघाडी मिळाली होती. ही निवडणूक चौगुले यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई बनली आहे. सेनेतून बंडखोरी करून पहिल्यांदाच निडणुकीस सामोरे जाणारे भाजपा उमेदवार वैभव नाईक यांचेही भवितव्य ठरेले. (प्रतिनिधी)
 
निकालातून ठरणार कार्यकत्र्याचे भवितव्य 
विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. विधानसभेत कोण जिंकणार, यावर पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वच कार्यकत्र्यानी त्यांच्या प्रभागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्यांच्या प्रभागात मताधिक्य मिळणार नाही त्यांच्यासाठी हा निकाल धोक्याची घंटा ठरेल.

 

Web Title: Who is the bet in Navi Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.