व्हाइटनर देत विद्यार्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: January 11, 2017 06:56 IST2017-01-11T06:56:06+5:302017-01-11T06:56:06+5:30

बारा वर्षीय विद्यार्थिनीला व्हाइटनरची नशा देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार साकीनाक्यात सोमवारी रात्री उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी चालकाला अटक केली आहे.

Whitener Molestation of Student | व्हाइटनर देत विद्यार्थिनीचा विनयभंग

व्हाइटनर देत विद्यार्थिनीचा विनयभंग

मुंबई : बारा वर्षीय विद्यार्थिनीला व्हाइटनरची नशा देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार साकीनाक्यात सोमवारी रात्री उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी चालकाला अटक केली आहे.
साकीनाका परिसरात पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. शाळेत जाताना रस्त्यात लागणाऱ्या प्रिन्स नावाच्या बेकरीमध्ये ती बिस्कीट आणि चॉकलेट आणण्यासाठी जायची. त्यामुळे या बेकरीचा चालक सादीक अन्सारी (३२) याच्याशी तिची ओळख झाली. याचा फायदा घेत अन्सारी या मुलीला खाऊचे आमिष दाखवायचा आणि व्हाइटनरची नशा देत तिच्यासोबत अश्लील कृत्य करायचा. गेले दोन ते तीन महिने हा प्रकार सुरू होता.
सोमवारीदेखील त्याने अशाच प्रकारे या मुलीला व्हाइटनर ओढायला सांगितले. मात्र त्याची तिला थोडी जास्तच नशा झाली आणि बेकरीतून निघून तिच्या घरी गेली. तेव्हा तिला नशेमुळे नीट चालता येत नव्हते. तेव्हा तिच्या पालकांनी तिला याबाबत विचारले. तेव्हा घडलेला प्रकार तिने पालकांना सांगितला. त्यानुसार तिच्या पालकांनी आणि स्थानिकांनी अन्सारीला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्सारीला अटक करून त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Whitener Molestation of Student