वडखळ बाजारात सफेद कांद्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2015 22:26 IST2015-04-26T22:26:13+5:302015-04-26T22:26:13+5:30

सततच्या बदलत्या वातावरणामुळे सर्वांनाच मान्सून हंगामाची चाहूल लागली आहे. खरिपाची बेगमी म्हणून मसाले, लोणची, पापड, शेवया, कैरीची उसळ, कडधान्ये

The white onions increased in the white market | वडखळ बाजारात सफेद कांद्याची आवक वाढली

वडखळ बाजारात सफेद कांद्याची आवक वाढली

दत्ता म्हात्रे, पेण
सततच्या बदलत्या वातावरणामुळे सर्वांनाच मान्सून हंगामाची चाहूल लागली आहे. खरिपाची बेगमी म्हणून मसाले, लोणची, पापड, शेवया, कैरीची उसळ, कडधान्ये याचबरोबरीने कांदा घाऊकरीत्या खरेदी केला जातो. अलिबागचा कांदाही गुणकारी व चवीचा असल्याने त्याच्या विक्रीत व मागणीतही वाढ झाली आहे.
येथेच पिकणारा सफेद कांदा दररोजच्या जेवणात रुचीने खाण्यासाठी महिला वापरतात. अलिबागचा सफेद कांदा सध्या वडखळ बाजारपेठेत भाव खात आहे. इतर गृहोपयोगी वस्तू, किराणा सामानाच्या खरेदीसोबत पांढऱ्या कांद्याच्या एक-दोन माळाही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.
कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच वडखळ हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने दररोज ये-जा करणारे पर्यटक, चाकरमानी व स्थानिक ग्राहक सध्या या सफे द कांद्याच्या मोहात पडले आहेत. कांद्याची एक तरी माळ घरी नेण्याकरिता ग्राहक उत्सुक असताना दिसत आहेत. दोन ते अडीच किलो वजनाची ही माळ ८० ते १२० रुपये या दरात विक्री केली जाते. मात्र अलिबागचा सफेद कांदा गोडी, रुची व आरोग्यदृष्ट्या गुणकारी असल्याने अलिबागचाच कांदा आहे का, याची खात्री करूनच खरेदी करत आहेत.
पेणच्या ग्रामदैवतांच्या यात्रेतील कांद्याची बाजारपेठ अक्षय्यतृतीयेला संपल्याने आता वडखळ नाका ही सफेद कांद्याच्या माळा मिळण्याचे एकमेव ठिकाण बनले आहे. वडखळला शुक्रवारचा मोठा आठवडा बाजार भरतो. याशिवाय मार्च ते जून अखेरपर्यंत सफे द कांद्याच्या माळा येथे विक्रीसाठी हमखास उपलब्ध असतात. रस्त्यावरच्या टपऱ्यांवर या मालाची आरास ग्राहकांना आकर्षित करते.

Web Title: The white onions increased in the white market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.